वर्तमान काळात बरेच लोक स्वतःचा बिजनेस स्टार्ट करण्याचा विचार करत आहेत, कारण भारतामध्ये आता बिझनेस सुरू करणे अधिक सोपे झाले आहे. यापूर्वी लोकांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी बऱ्याच प्रकारचे डॉक्युमेंट्स जमा करण्याची Long process फॉलो करावी लागायची, यामध्ये लोकांचा खूप वेळ वाया जायचा.
परंतु आता गव्हर्मेंट ने स्वतःचा बिजनेस सुरू करण्यासाठी लोकांना बऱ्याच प्रकारच्या सुविधा प्रदान केलेल्या आहेत, ज्यामुळे बिझनेस सुरू करण्याकडे लोकांचा कल दिसून येतो. लोक स्वतःच्या युनिक बिजनेस आयडियाज मार्केटमध्ये आणून खूप चांगला बिझनेस करत आहेत.
बरेच लोक कमी पैशांमध्ये बिजनेस स्टार्ट करायचा विचार करत असतात, आणि त्यांना हे जाणून घ्यायचे असते की कमी पैशांमध्ये बिजनेस कसा स्टार्ट केला जाऊ शकतो, ज्यामध्ये चांगली कमाई होऊ शकेल. या आर्टिकल मध्ये आपण जाणून घेणार आहोत की कमी पैशांमध्ये कसा सुरू करावा जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त नफा मिळवता येईल.
कमी पैशात चांगला बिजनेस कसा करावा?
जेव्हा एखादा बिजनेस करायची गोष्ट येते तेव्हा सगळ्यात मोठा प्रश्न हा असतो की भांडवल कुठून आणायचे? कारण बिझनेस सुरु करण्यासाठी प्रत्येकाकडेच पैसे नसतात. पण मित्रांनो तुमच्या कडे पैसे नसतील तर तुम्ही गव्हर्नमेंटद्वारे लॉन्च केल्या गेलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या स्कीम द्वारे तुम्हाला हवे तेवढे लोन प्राप्त करू शकता आणि स्वतःच बिजनेस सुरू करू शकता.
कमी पैशामध्ये जास्त नफा मिळवून देणारा बिझनेस कोणता आहे?
Zero Investment Business Plan in Marathi
1. वडापाव चा बिजनेस
आम्ही स्वतः हा बिजनेस करायचा विचार करत आहोत. जर तुम्हाला असे वाटत असेल की वडापाव चा बिजनेस कमी पैशात जास्त नफा मिळवून देणारा बिझनेस आहे तर तुम्ही अगदी बरोबर आहात. परंतु हा बिजनेस करण्यासाठी आम्ही तुम्हाला एक अशी आयडिया सांगणार आहोत जेणेकरून तुम्हाला खूप कमी मेहनत करावी लागेल. आणि करून तुम्ही दिवसाला 3 ते 4 हजार रुपये देखील कमवू शकता.
वडापावचा बिजनेस स्टार्ट करण्यासाठी तुम्हाला कोणताही गाळा विकत घ्यायची गरज नाही, कोणत्याही रेल्वे स्टेशनच्या बाहेर एक गाळा भाड्याने घेऊन तिथे तुम्ही वडापाव तयार करू शकता. तुम्हाला फक्त वडे बनवायचे आहेत पाव तयार करायची गरज नाही कारण हे तुम्हाला रेडीमेड बाजारामध्ये मिळून जातील.
यानंतर तयार झालेले वडापाव तुम्ही बागेमध्ये भरून रेल्वे स्टेशनवर जाऊन विकू शकता त्याचबरोबर येणाऱ्या जाणाऱ्या ट्रेनमध्ये देखील वडापाव विकू शकता. व्यवसायाची सगळ्यात मुख्य गोष्ट अशी आहे की यामध्ये तुम्हाला ग्राहकांची कमी नसेल.
याप्रकारे जर तुम्ही दिवसभरामध्ये 100 वडापाव रुपये दहा या हिशोबाने विकता तर तुमची कमाई जवळपास ₹1000 रुपये होईल. याप्रकारे जर तुम्ही 500 वडापाव विकले तर तुमची एका दिवसाची कमाई 5000 रुपये होईल. या प्रकारे तुमची महिन्याची कमाई दीड लाख रुपये होईल. ज्यामध्ये सगळा खर्च वजा केल्यानंतर तुमच्या हातात जवळपास 80 ते 90 हजार रुपये राहतील.
सांगा तर मग आहे ना हा कमी पैशात जास्त नफा मिळवून देणारा बिझनेस.
2: चाइनीस फूड चा बिजनेस
भारतामध्ये जास्त लोकांना तिखट खायला आवडते. अशा मध्ये जर तुम्हाला कमी पैशात जास्त नफा मिळवून देणारा बिझनेस करायचा असेल तर तुम्ही चायनीज फूडचा बिझनेस स्टार्ट करू शकता. तसं पाहायला गेलं तर फास्ट फूड आपल्या आरोग्यासाठी हानिकारक असते पण टेस्टसाठी लोक यास अवश्य खाणे पसंत करतात.
चायनीज फूडचा बिजनेस स्टार्ट करण्यासाठी तुम्हाला अशा ठिकाणी दुकान घ्यायचे आहे जिथे जास्त गर्दी असते. रेल्वे स्टेशन, बस स्टेशन किंवा कोणतेही भाजी मार्केट इत्यादी ठिकाणी तुम्ही हा बिजनेस करू शकता. याव्यतिरिक्त तुम्हाला एक चांगले चायनीज फूड बनवणाऱ्या कारागिराची देखील आवश्यकता लागेल. हा बिजनेस संपूर्णपणे तुमच्या टेस्ट वर आधारित असतो. यामुळेच तुम्ही जेवढी चांगली टेस्ट द्याल तुमचा धंदा तेवढाच जास्त होईल.
चायनीज फूड बिजनेस स्टार्ट करण्यासाठी तुम्हाला कमीत कमी दहा ते वीस हजार रुपये इतके भांडवल लागू शकते. आणि याच्या कमाई बद्दल बोलायचं झालं तर तुम्ही दर महिन्याला 60 ते 70 हजार रुपये नक्कीच कमवू शकता. तुमची ही कमाई तुम्ही हा बिझनेस कोणत्या क्षेत्रामध्ये करत आहात यावर देखील बऱ्याच प्रमाणावर डिपेंड करते जसे की ग्रामीण क्षेत्र आणि शहरी क्षेत्र.
3. मसाल्यांचा बिजनेस
जेवणाला टेस्टी बनवण्यासाठी मसाल्यांचा उपयोग केला जातो. मसाले ही अशी गोष्ट आहे ज्याच्याशिवाय जेवण बनवू शकत नाही. आणि म्हणूनच जर तुम्हाला मसाल्यांचा बिजनेस करायचा असेल तर, हा एक चांगला नफा मिळवून देणारा बिझनेस ठरू शकतो. त्याचबरोबर या बिझनेस ला तुम्ही खूप कमी इन्वेस्टमेंट सोबत सुरु करू शकता.
हा व्यवसाय तुम्ही तुमच्या घरापासून देखील स्टार्ट करू शकता. यासाठी तुम्हाला घाऊक दरात खडे मसाले आणावे लागतील आणि आपल्या घरी आणून तुम्ही काही लोकांच्या मदतीने त्यांना वाटून (दळून) देऊ शकता.
आजकाल बाजारामध्ये बऱ्याच मशीन देखील उपलब्ध आहेत. आणि यामुळेच हे काम तुम्ही अगदी सहजरीत्या करू शकता. जर तुम्ही मशीन शिवाय मसाल्यांचा बिजनेस स्टार्ट करू इच्छिता तर या बिझनेससाठी तुम्हाला 10 ते 15 हजार रुपयांची इन्व्हेस्टमेंट लागू शकते. आणि जर तुम्ही एखादी मशीन विकत घेतली तर 20 ते 25 हजार रुपये तुम्हाला यासाठी लागू शकतात.
व्यवसायामध्ये तुमचा फायदा, तुम्ही किती मसाला विकू शकता या गोष्टीवर अवलंबून असेल. जेवढा जास्त मसाला तुम्ही विकाल तेवढी जास्त इन्कम तुम्ही प्राप्त करू शकता.
4. झेरॉक्स चा बिजनेस
जर तुम्हाला खूप कमी इन्वेस्टमेंटने खूप जास्त फायदा मिळवणारा बिझनेस सुरू करायचा असेल तर तुम्ही फोटोकॉपी चा बिजनेस किंवा झेरॉक्स चा बिजनेस स्टार्ट करू शकता.
आजच्या काळामध्ये सर्वात जास्त नफा मिळवून देणाऱ्या बिजनेस मध्ये हा देखील आहे. फोटोकॉपी चा बिजनेस सुरू करण्यासाठी तुम्हाला एका मशीनची आवश्यकता लागेल त्याचबरोबर तुम्हाला दुकानाची देखील आवश्यकता लागेल. या बिजनेसमधून जास्तीत जास्त नफा मिळवण्यासाठी तुम्हाला तुमची झेरॉक्स चे दुकान कोणत्याही स्कूल,कॉलेज, किंवा गर्दी असलेल्या ठिकाणी किंवा आरटीओ ऑफिस च्या जवळ सुरू करायचे आहे.
झेरॉक्स चा बिजनेस करून तुम्ही दर महिन्याला 30 ते 40 हजार रुपये आरामात कमवू शकता.यानंतर जेव्हा तुम्हाला जास्त फायदा व्हायला लागेल, तेव्हा तुम्ही एखादा कम्प्युटर आणून विद्यार्थ्यांचे ऑनलाइन परीक्षेचे फॉर्म भरून देखील पैसे कमवू शकता.
5. टिफिन सर्विस चा बिजनेस
बिझी लाईफ स्टाईल असल्यामुळे लोकांकडे आजकाल सकाळचा नाश्ता करायला देखील वेळ नसतो. जे लोक स्वतःसाठी जेवण बनवू शकत नाहीत ते कोणत्याही रेस्टॉरंट किंवा हॉटेलमध्ये जाऊन जेवण करतात, परंतु हॉटेलचे जेवण त्यांना महाग आणि unhealthy वाटायला लागते.
यामुळे बरेच लोक टिफिन सर्विसेस घेणे पसंत करतात. टिफिन सर्विसेस चा बिजनेस स्टार्ट करण्यासाठी तुम्ही एखादी मोठी कंपनी, बॉईज हॉस्टेल, स्कूल, कॉलेज किंवा मग गर्ल्स हॉस्टेलच्या जवळपास स्वतःचा टिफिन सर्विसेस चा बिजनेस स्टार्ट करू शकता. कारण तुमचे ग्राहक जास्त करून यापैकीच असतात, हा बिजनेस तुम्ही फक्त १० ते १२ हजार रुपयांच्या भांडवलामध्ये चालू करू शकता. टिफिन सर्विस बिझनेस चालू करून तुम्ही महिन्याला चांगला फायदा प्राप्त करू शकता.
तुमचे जेवढे जास्त ग्राहक होतील तेवढी जास्त इन्कम तुम्ही मिळवू शकता. या बिझनेस मध्ये सुद्धा टेस्टला फार महत्त्व आहे.आणि म्हणूनच जर तुम्ही टेस्टी जेवण बनवत असाल तर ग्राहक नक्कीच वाढतील आणि तुमची कमाई देखील वाढेल.
6. मोबाइल रिचार्ज चे दुकान
जर तुमच्याकडे पैशांची कमतरता आहे आणि कमीत कमी पैशांमध्ये तुम्हाला चांगला बिझनेस सुरू करायचा असेल, तर तुम्ही मोबाईल रिचार्ज चे दुकान चालू करू शकता. आज भले लोक ऑनलाईन रिचार्ज करतात परंतु बरेच लोक असे आहेत जे मोबाईल रिचार्ज दुकानात जाऊन रिचार्ज करतात.
आणि म्हणूनच हा एक चांगला बिझनेस होऊ शकतो. रिचार्ज शॉप चालू करण्यासाठी तुम्हाला जास्त झंझट करायची गरज नाही. फक्त यासाठी तुम्हाला एक छोटेसे दुकान घ्यायचे आहे आणि मोबाईल रिचार्ज कुपन विकायचे आहेत. हा बिझनेस तुम्ही दहा ते वीस हजारांपासून सुरू करू शकता. या बिझनेसच्या कमाई बद्दल बोलायचं झालं तर जितके जास्त लोकांच्या फोनचे रिचार्ज तुम्ही कराल तेवढे जास्त कमिशन तुम्हाला कंपनीतर्फे देण्यात येईल. आणि म्हणूनच हा बिजनेस तुम्ही गर्दीच्या ठिकाणी चालू करू शकता, कारण जास्तीत जास्त लोक तुमच्या दुकानाकडे येतील आणि मोबाईल फोनचा रिचार्ज करतील ज्यामुळे तुम्हाला अधिक नफा प्राप्त होईल.
तर मित्रांनो कमी भांडवलामध्ये बिझनेस कसा सुरू करावा हा आर्टिकल जर तुम्हाला आवडला असेल तर कमेंट बॉक्स मार्फत आम्हाला नक्की कळवा.
धन्यवाद.
हे देखील वाचा