पीएम डिजिटल हेल्थ मिशन कार्ड कसे बनवावे | How to make NDHM Card in Marathi

डिजिटल हेल्थ मिशन कार्ड कसे बनवावे: मित्रांनो सरकार देशातल्या नागरिकांसाठी वेगवेगळ्या सुविधा जाहीर करत असते. अशीच एक योजना प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी यांनी सुरू केलेली आहे ज्याचे नाव आहे पी एम डिजिटल हेल्थ मिशन जी देशातील लोकांसाठी सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेनुसार देशातील सर्व नागरिकांना एक युनिक ID कार्ड (digital health ID card) उपलब्ध करून दिले जाणार आहे. ज्यामध्ये त्यांच्या स्वास्थ्य संबंधित माहिती असेल. याबरोबरच पीएम डिजिटल हेल्थ मिशनच्या माध्यमातून देशाच्या स्वास्थ्य सुविधेमध्ये क्रांतिकारी बदल घडून येऊ शकेल.

National Digital Health Mission Registration in Marathi

Digital Health ID Card in Marathi: मित्रांनो या मध्ये आपले सरकार भारतातील नागरिकांना डिजिटल ID कार्ड उपलब्ध करून देईल ज्यामध्ये प्रत्येक नागरिकाच्या हेल्थ शी संबंधित रेकॉर्ड डिजिटल माध्यमातून सुरक्षित राहू शकणार आहे. आजच्या या लेखांमधून आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की घरबसल्या पीएम डिजिटल हेल्थ मिशन कार्ड कसे बनवावे, डिजिटल हेल्थ कार्डमुळे मिळणारे लाभ कोणते आहेत, डिजिटल हेल्थ मिशन काय आहे, इत्यादी. इतर सर्व सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.

पीएम डिजिटल हेल्थ मिशन काय आहे?

मित्रांनो या कार्ड मध्ये आवेदन कर्त्याला डिजिटल आयडीमुळे मिळणारा सगळ्यात मोठा फायदा हा असेल की देशातल्या कोपऱ्यात कुठेही जर ती व्यक्ती उपाय करण्यासाठी जात असेल तर त्यासाठी कोणत्याही फाईल, रिसिप्ट, टॅब्लेट्स किंवा रेकॉर्डची गरज भासणार नाही. त्या व्यक्तीची सर्व माहिती हेल्थ कार्ड मध्ये रेकॉर्ड मध्ये असेल. हेल्थ कार्डद्वारे डॉक्टरांना तुमच्या आधीच्या आजाराबद्दल माहिती मिळेल, त्याचबरोबर तुमची ट्रीटमेंट कुठे चालू होती याबद्दल देखील माहिती मिळेल. प्रधानमंत्री मोदीजींनी 15 ऑगस्ट 2020 मध्ये लाल किल्ल्यावर भाषण करताना सांगितले की ही सेवा देशातील अंदमान निकोबार, चंदिगड, दादरा नगर हवेली, लक्षद्वीप, लडाख मध्ये चालू आहे परंतु आता हे मिशन लवकरच सर्व देशातिल जिल्ह्यात लागू करण्यात आले आहे.

पीएम नरेंद्र मोदी या योजनेबद्दल काय म्हणाले?

ही सेवा भारतातील नागरिकां करिता सुरू करते वेळी नरेंद्र मोदीजी म्हणाले की मागील सात वर्षांपासून स्वास्थ्य सुविधा मजबूत करण्याचा प्रत्येक प्रयत्न सरकारद्वारे केला जात आहे, ज्यामुळे देशामध्ये आरोग्य संबंधी क्रांतिकारी परिवर्तन घडू शकेल. आयुष्यमान भारत डिजिटल मिशन देशातील संपूर्ण हॉस्पिटलला डिजिटल हेल्थ सोल्युशनला एकमेकांसोबत कनेक्ट करेल. ज्यानुसार नागरिकांना डिजिटल ID देण्यात येईल. ज्यामध्ये त्यांच्या स्वास्थ्य संबंधित माहिती रेकॉर्ड असेल.

युनिक डिजिटल हेल्थ कार्ड

या पीएम डिजिटल हेल्थ मिशनच्या अंतर्गत हेल्थ कार्ड एक प्रकारे नागरिकाचे ओळखपत्र असेल. हे आधार कार्ड प्रमाणेच असेल. ज्यामध्ये 14 आकड्यांचा रँडम प्रकारे जनरेट केलेला एक नंबर असेल. या माध्यमातून पेशंटची हिस्ट्री समजेल. या कार्डवर एक क्यूआर कोड देखील उपलब्ध असेल. नागरिक हे आधार कार्डद्वारे देखील बनवू शकतात.

Digital Health ID Card बनवल्यानंतर कोणत्याही रिसिप्ट घेऊन जावे लागणार नाही

या मिशनुसार प्रत्येक पेशंटचा मेडिकल डाटा ठेवण्यासाठी हॉस्पिटल, क्लिनिक, डॉक्टर्स ना एका सेंट्रल सर्वर मध्ये लिंक केले जाईल. म्हणजेच यामध्ये हॉस्पिटल्स डॉक्टर आणि क्लिनिक देखील रजिस्टर असेल. सध्या सरकारद्वारे हे सगळ्यांसाठी अनिवार्य नाही परंतु, प्रयत्न हाच असेल की या सगळ्यांना सिस्टीम मध्ये जोडले जावे. ज्यानंतर सर्वांची पर्सनल हेल्थ इन्फॉर्मेशन चा रेकॉर्ड ठेवणे सोपे जाईल, आणि तमाम रिसिप्ट, डॉक्टरचे पीस्क्रीप्शन, आणि bills सोबत ठेवण्याची कटकट करावी लागणार नाही.

पीएम डिजिटल हेल्थ मिशन संबंधित माहिती

 • डिजिटल हेल्थ कार्डच्या माध्यमातून पेशंटचा डेटा डिजिटली स्टोअर केला जाईल.
 • नागरिकांना कोणत्याही हॉस्पिटलला जातेवेळी आपला मेडिकल रेकॉर्ड घेऊन जावे लागणार नाही.
 • मिशनच्या सुरुवातीला सरकारने 500 करोड चे बजेट निर्धारित केली आहे.
 • पीएम डिजिटल हेल्थ मिशन, देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुरू केले आहे.
 • डिजिटल हेल्थ कार्ड मध्ये नागरिकांचे स्वास्थ रेकॉर्ड गोपनीय ठेवले जाईल.
 • या हेल्थ कार्डच्या माध्यमातून चिकित्सा क्षेत्रामध्ये क्रांती येऊ शकेल.
 • योजनेअंतर्गत युनिक ID कार्ड ज्या व्यक्तींना दिले जाईल त्यांना एक युनिक ID देखील प्रदान केला जाईल ज्या माध्यमातून ते पोर्टलवर लॉगिन करू शकतील.
 • नागरिक आणि हॉस्पिटल आपल्या मर्जीनुसार हेल्थ कार्ड बनवू शकतात. ज्या नागरिकांना हेल्थ कार्ड बनवायचे नाही अशांनी आवेदन करू नये. कारण हे कार्ड सध्या सर्व नागरिकांना अनिवार्य नाही.

पीएम डिजिटल हेल्थ मिशन कार्ड असे बनवावे 

पीएम डिजिटल हेल्थ मिशन कार्ड बनवून घेण्यासाठी पुढील स्टेप्स फॉलो करा

 • आवेदकाला सर्वप्रथम नॅशनल डिजिटल हेल्थ मिशनच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
 • यानंतर तुमच्यासमोर वेबसाईटचे होम पेज दिसेल.
 • होम पेजवर तुम्हाला युनिक डिजिटल हेल्थ कार्ड बनवण्यासाठी create ABHA number ह्या option वर क्लिक करावे लागेल.
 • National Digital Health Mission Registration | NDHM Apply क्लिक केल्यावर तुमच्यासमोर नवीन पेज ओपन होईल.
 • नवीन पेजवर तुम्हाला create your health id now या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.
 • इथे तुम्ही दोन प्रकारे आपले हेल्थ ID बनवू शकता. जर तुम्ही generate Via Aadhar वर click केले तर तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर टाकावा लागेल. आणि जर तुम्ही using driving licence या ऑप्शन वर क्लिक केले तर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकावा लागेल.
 • यानंतर तुमच्या फोनवर एक OTP पाठवला जाईल तो तुम्हाला त्या बॉक्समध्ये भरायचा आहे.
 • आता तुमच्यासमोर एक फॉर्म ओपन होईल.
 • फॉर्ममध्ये विचारलेली सर्व माहिती तुम्हाला भरून Upload करायची आहे.
 • सर्व माहिती भरून झाल्यावर तुम्हाला सबमिट बटन वर क्लिक करायचे आहे.
 • क्लिक केल्यावर तुमची हेल्थ ID जनरेट झालेली असेल.

Digital Health ID Card नंबरने लॉगिन करण्याची प्रक्रिया 

 • सर्वप्रथम नॅशनल डिजिटल हेल्थ मिशन च्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
 • होम पेजवर तुम्हाला क्रिएट हेल्थ ID या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे.
 • क्लिक केल्यावर तुमच्या समोर लगेच नवीन पेज ओपन होईल. नवीन पेजवर तुम्हाला लॉगिन या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे.
 • यानंतर तुम्हाला तुमचा हेल्थ ID भरायचा आहे त्यानंतर तुम्हाला फोनवर OTP सेंड केला जाईल. तो भरल्यानंतर तुम्ही लॉगिन होऊ शकता.

Benefits of National Health Mission in Marathi

Benefits of National Health Mission in Marathi
Benefits of National Health Mission in Marathi

गरजूंना वाजवी दरात आणि चांगल्या दर्जाची आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे हे त्याचे उद्दिष्ट आहे.

NDHM Card मुले खालील फायदे झाले आहेत.

 • हे ग्रामीण व शहरी भागातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत लोकांना स्वस्त आणि चांगल्या दर्जाच्या आरोग्य सेवा पुरवते.
 • हे आरोग्य व्यवस्थेच्या पायाभूत सुविधांना मजबूत करते.
 • त्यामुळे दारिद्र्यरेषेखालील गरोदर महिलांच्या मृत्यूचे प्रमाण लक्षणीय घटले आहे, तंबाखूचे प्रमाण आणि तंबाखू सेवन करणाऱ्यांची संख्याही कमी झाली आहे.
 • या मिशन अंतर्गत जननी शिशू सुरक्षा कार्यक्रम गरोदर महिलांना सार्वजनिक आरोग्य संस्थांमध्ये मोफत बाळंतपणाचा अधिकार देतो.

पीएम डिजिटल हेल्थ मिशन कार्ड कसे बनवावे? हेल्पलाइन नंबर

जर कोणत्याही नागरिकाला डिजिटल हेल्थ कार्ड संबंधित कोणत्या प्रकारची समस्या असेल किंवा या संबंधित अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर खालील दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकता.

हेल्पलाइन नंबर: 1800114477

Conclusion

तर तुम्हाला या लेखातून युनिक डिजिटल हेल्थ कार्ड चे महत्व समजले असेलच. आम्ही तुम्हाला या आर्टिकल मध्ये पीएम डिजिटल हेल्थ मिशन कार्ड बद्दल सर्व सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर तुमच्या मनात या आर्टिकल संबंधित काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मार्फत आम्हाला नक्की कळवा.

धन्यवाद.

हे देखील वाचा

Maharashtra Atal Saur Krishi Pump Yojana

Maharashtra Atal Saur Krishi Pump Yojana

नमस्कार मित्रांनो marathiyojana.com या वेबसाईट वर तुमचे स्वागत आहे. मित्रांनो आज काल सर्व गोष्टी ऑनलाईन झाल्या आहेत, म्हणजे बघा आज काल आपण घर बसल्याच आपल्याला मोबईल च्या साहाय्याने सर्व महत्वाची माहिती मिळून जाते. आपले भारतीय सरकारआपल्या सर्वांसाठी नवनवीन योजना आणत असतो. आणि त्या योजनांचा आपल्याला कसा फायदा करता येईल किव्हा त्या योजनांसाठी नोंदणी कशी करायची या संदर्भात सर्व माहिती तुम्हाला आमच्या या मराठी योजना वेबसाईट वर मळून जाईल.

2 thoughts on “पीएम डिजिटल हेल्थ मिशन कार्ड कसे बनवावे | How to make NDHM Card in Marathi”

Leave a Comment