Mukhyamantri Annapurna Yojana Marathi Mahiti I वर्षाला 3 मोफत सिलेंडर देण्यात येणार

Mukhyamantri Annapurna Yojana Marathi Mahiti I वर्षाला 3 मोफत सिलेंडर देण्यात येणार

28 जून 2024 रोजी अजित पवार यांनी महाराष्ट्र सरकारचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला, ह्या मध्ये सरकारने विविध योजनांची घोषणा केली. या अर्थसंकल्पामधील महत्वपूर्ण घोषणा केली गेली ती म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या योजनेअंतर्गत वर्षाला 3 मोफत सिलेंडर देण्यात येणार आहेत,परंतु यासाठी आवश्यक पात्रता काय आहे ,कागदपत्रे काय लागतील ,अर्ज कसा करायचा याबद्दलच अधिक माहिती जाणून घेऊयात …

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा उद्देश महाराष्ट्र राज्यामधील गरीब कुटुंबांना स्वस्त दरामध्ये तांदूळ,गहू आणि इतर खाद्यपदार्थ उपलब्ध करून देणे हा आहे.

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजने अंतर्गत पात्र नागरिकांना वर्षाला 3 मोफत सिलेंडर देण्यात येणार आहेत, महाराष्ट्रातील 52.4 लाख कुटुंबीयांना या योजनेचा लाभ होणार आहे.

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या अंतर्गत 5 सदस्य असलेल्या कुटुंबांना दरवर्षी तीन मोफत सिलेंडर देण्यात येणार आहेत.

Mukhymantri Annapurna Yojana Eligibility criteria I मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना 2024 पात्रता

 • मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्र राज्यातील नागरिकांनाच घेता येणार आहे.
 • मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार व्यक्तीकडे रेशन कार्ड असणे आवश्यक आहे.
 • मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील नागरिकांनाच मिळणार आहे.
 • मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी व्यक्तिचे वार्षिक उत्पन्न हे सरकारने लागू केलेल्या उत्पन्नाच्या मर्यादेपेक्षा जास्त नसणे आवश्यक आहे.
 • कुटुंबामध्ये पाच सदस्य असणार्‍या व्यक्तींनाच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ घेता येणार आहे.

Mukhyamantri Annapurna Yojana required documents I मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना 2024 आवश्यक कागदपत्रे

 • आधार कार्ड
 • पासपोर्ट साइज फोटो
 • पॅन कार्ड
 • उत्पन्नाचे प्रमाणपत्र
 • पत्त्याचा पुरावा
 • रेशन कार्ड
 • कौटुंबिक आयडी पुरावा
 • जात प्रमाणपत्र

Mukhyamantri Annapurna Yojana Application Process I मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना 2024 अर्ज प्रक्रिया

 • मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या अंतर्गत पाच सदस्य असलेल्या कुटुंबांना वर्षाला तीन घरगुती गॅस सिलेंडर मोफत देण्यात येणार असण्याची घोषणा करण्यात आली .
 • मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ महाराष्ट्रामधील 52.4 लाख कुटुंबांना होणार आहे.
 • मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना” सुरू करण्याची घोषणा नुकतीच करण्यात आलेली असल्या कारणाने यासाठी अर्ज कसा करायचा याबद्दल अद्याप माहिती उपलब्ध नाही.

नमस्कार मित्रांनो marathiyojana.com या वेबसाईट वर तुमचे स्वागत आहे. मित्रांनो आज काल सर्व गोष्टी ऑनलाईन झाल्या आहेत, म्हणजे बघा आज काल आपण घर बसल्याच आपल्याला मोबईल च्या साहाय्याने सर्व महत्वाची माहिती मिळून जाते. आपले भारतीय सरकारआपल्या सर्वांसाठी नवनवीन योजना आणत असतो. आणि त्या योजनांचा आपल्याला कसा फायदा करता येईल किव्हा त्या योजनांसाठी नोंदणी कशी करायची या संदर्भात सर्व माहिती तुम्हाला आमच्या या मराठी योजना वेबसाईट वर मळून जाईल.

Leave a Comment