गावच्या बिजनेस आयडिया | Village Business Ideas in Marathi

मित्रांनो कोणताही धंदा छोटा किंवा मोठा नसतो. बरेचसे लोक व्यापार करण्यासाठी शहरावर निर्भर असतात. पण कोणता बिझनेस कुठून सुरू होतोय, याला जास्त महत्त्व नसतं परंतु तुमची बिझनेस आयडिया कशी आहे आणि कशाप्रकारे तुम्ही ते चालवता हे महत्त्वाचे आहे. स्वतःचा बिझनेस सुरू करण्यासाठी फक्त शहरांमध्ये जाऊनच बिझनेस सुरु करणे गरजेचे नाही तर तुम्ही जर ग्रामीण क्षेत्रातून असाल, तर तिथून देखील स्वतःचा व्यवसाय तुम्ही करू शकता.

गावाकडे चालणारे बिजनेस । Village Business Ideas in Marathi

आता तुम्हाला बिझनेस सुरू करण्यासाठी एक चांगली बिझनेस आयडिया आणि काही पैसे असणे गरजेचे आहे. आजच्या या लेखामध्ये आम्ही तुम्हाला गावाकडील बिजनेस आयडिया (village business ideas in Marathi) सांगणार आहोत. या लेखामध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की असे कोणते बिजनेस आहेत जे तुम्ही गावाकडे राहून सुरू करू शकता.

भारताची जवळपास 60 टक्के जनसंख्या ही ग्रामीण क्षेत्रांमध्ये राहते. भारताच्या इकॉनोमी मध्ये ग्रामीण क्षेत्राचं महत्त्वाचं योगदान आहे. अशा या ग्रामीण क्षेत्रामध्ये बिझनेस करणे तुमच्यासाठी फायदेशीर असू शकते, कारण तिथे तुम्हाला जास्त कॉम्पिटिशन बघायला मिळणार नाही. गावाकडे तुम्ही असे बरेचसे व्यापार करू शकतात ज्यामध्ये तुम्हाला कितीतरी पट नफा मिळू शकतो. आम्ही खाली काही बिझनेस आयडिया देत आहोत ज्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार हवी ती बिझनेस आयडिया समजून घेऊन तुमचा स्वतःचा बिजनेस तुमच्या गावामधून च सुरु करू शकता.

चला तर मग पाहूयात गावाकडील भन्नाट बिझनेस आयडिया – 

1. अगरबत्ती बनवण्याचा बिझनेस । Agarbatti making Business Idea in Marathi

अगरबत्तीची आवश्यकता प्रत्येक घरामध्ये असते. आपल्याला पूजेच्या साहित्यामध्ये अगरबत्ती लागते. पूजेमध्ये विविध सणांमध्ये अगरबत्तीचा उपयोग घराघरांमध्ये केला जातो आणि याची डिमांड नेहमी असते आणि महत्वाचे म्हणजे तुम्ही हा बिजनेस घरबसल्या देखील चालू करू शकता, तुम्ही जर गृहिणी असाल तर घरातली सर्व कामे करून ५-६ तासांसाठी देखील का business करून पैसे कमवू शकता.

Agarbatti making Business Idea in Marathi
Agarbatti making Business Idea in Marathi

अगरबत्ती बनवायच्या बिझनेस मध्ये तुम्हाला 70 ते 80 हजार रुपये इन्वेस्ट करावे लागतील. ज्यामध्ये तुमचे प्रॉफिट मार्जिन दहा रुपये प्रतील किलो इतके असेल. तुमची अगरबत्ती जशी विकणे स्टार्ट होईल, तसे तुम्हाला पैसे मिळत जातील. जर प्रतिदिन तुम्ही 200 किलो अगरबत्ती विकली तर तुम्हाला पन्नास ते साठ हजार रुपये महिन्याला कमाई होईल.

2. मसाल्यांचा बिजनेस । Spice Business Business Idea in Marathi

रोजच्या जेवणामध्ये मसाल्यांना अनन्य साधारण महत्व भारतामध्ये आहे. मसाल्याविना जेवणाला चव येत नाही, आणि याच मसाल्यांची डिमांड ही वर्षभर असते. यामुळेच भारताला मसाल्यांचा देश म्हणून देखील जगभरात ओळख आहे. तुम्ही देखील तुमच्या बिझनेसला मसाल्यांनी ओळख देऊ शकता. मिरची पावडर, हळद, धणे पावडर, कश्मीरी पावडर, इत्यादी बऱ्याच प्रकारचे मसाले विकून तुम्ही चांगला नफा मिळवू शकता.

मसाल्यांच्या बिजनेस मध्ये तुम्हाला 70 ते 80 हजार रुपये इन्वेस्ट करावे लागतील. ज्यामध्ये 60 ते 70% प्रॉफिट मार्जिन असेल. तुम्ही महिन्याला या बिझनेस मधून 40 ते 50 हजार रुपये नक्की कमवू शकता. हा बिजनेस चालू केल्यानंतर सर्वप्रथम तुम्ही स्वतः काम करू शकता, नफा झाल्यानंतर आणि डिमांड वाढल्यानंतर तुम्ही या कामासाठी इतर कर्मचारी नियुक्त करू शकता. या बिझनेससाठी तुम्हाला मसाले कुटण्याची मशीन विकत घ्यावी लागेल, त्यासाठी तुम्हाला पैसे गुंतवावे लागतील पण त्याचा फायदा तुम्ही आयुष्यभर घेऊ शकता.

3. किराणामालाचे दुकान । Grocery store Business Idea in Marathi

हा बिझनेस तुमच्यासाठी खूप लाभदायक ठरू शकतो. रोजच्या दिवसात लागणाऱ्या खाण्यापिण्याच्या गोष्टी तुम्हाला किराणा स्टोअर मध्ये मिळतात. आपल्याला प्रत्येक वेळेस काही ना काही खाण्याची गोष्ट लागत असते ज्यासाठी आपण जवळच्या किराणा मालाच्या दुकानात जाऊन ती गोष्ट विकत घेत असतो. अशा मध्ये एक गाव साईडला जर तुम्ही देखील स्वतःचे किराणा मालाचे स्टोअर सुरू कराल तर यामध्ये तुम्हाला नक्कीच फायदा मिळू शकतो.

किराणा मालाचे दुकान सुरू करण्यासाठी तुम्हाला जवळपास १ लाख रुपये गुंतवावे लागतील. ज्यामध्ये प्रॉफिट मार्जिन 1 ते 3 टक्के असेल. किराणा मालाच्या दुकानांमध्ये तुम्हाला त्या सर्व गोष्टी ठेवायच्या आहेत ज्या लोकांना दररोज लागतात, असे केल्यामुळे ग्राहक दुसऱ्या दुकानांकडे वळणार नाही व सर्व सामान तुमच्याच दुकानातून खरेदी करेल. या बिझनेस मधून तुम्ही महिन्याला 50 ते 60 हजार रुपये नक्कीच कमवू शकता.

4. स्टेशनरीचे दुकान । Stationery store Business Idea in Marathi

शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पेन,पेन्सिल, खोडरबर, कंपास, वह्या, पुस्तके इत्यादीची गरज असते. शिक्षणासाठी लागणाऱ्या या गोष्टी विकत घेण्यासाठी मुलांना स्टेशनरीच्या दुकानात जावे लागते. तुमच्या गावामध्ये जिथे कुठे शाळा असेल त्या दुकानाच्या समोर किंवा आजूबाजूला तुम्ही स्टेशनरीचे दुकान सुरू करू शकता. स्टेशनरीच्या दुकानासाठी तुम्हाला कमीत कमी १ लाख रुपये तरी गुंतवावे लागतील. ज्यामध्ये तुम्हाला 30 ते 40% प्रॉफिट मिळेल. या बिझनेस मधून तुम्ही 30 ते 40 हजार दरमहा आरामात कमवू शकता. आणि Business मध्ये तुमचे सामान खराब होण्याची भीती नसते.

5. मेडिकल स्टोर । Medical store Business Idea in Marathi

जर तुम्ही मेडिकल सायन्सचे स्टुडन्ट असाल आणि तुमचा बिजनेस गावामध्ये सुरू करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही जवळच्या हॉस्पिटलच्या आजूबाजूला मेडिकल स्टोअर टाकू शकता. मेडिकल स्टोअर सुरू करण्यासाठी तुम्हाला दोन ते तीन लाख रुपये गुंतवावे लागतील. ही रक्कम कमी किंवा जास्त देखील असू शकते. तुम्हाला या बिजनेस मध्ये 5 ते 30 टक्क्यांपर्यंत प्रॉफिट मार्जिन मिळते. तुम्ही मेडिकल स्टोअर मध्ये इतरही गोष्टी विकायला ठेवू शकता. मेडिकल स्टोअर मधून तुम्ही दरमहा एक ते दीड लाख रुपये नक्की कमवू शकता.

६. कंप्यूटर ट्रेनिंग क्लास । Computer Training School Business Idea in Marathi

मित्रांनो जर का तुम्ही कंप्युटर मध्ये तुमचे शिक्षण घेतले असाल किव्हा तुम्हाला कंप्युटर संबंधीची चांगली माहिती आहे तर तुम्ही तुमच्या गावात कंप्यूटर ट्रेनिंग स्कूल सुरु करू शकता. त्यासाठी तुम्ही computer भाड्याने सुद्धा घेऊ शकता व एकदा का तुमचे classes नियमित चालायला लागले कि तुम्ही स्वतः computer विकत देखील घेऊ शकता. कारण गावाकडच्या लोकांना कंप्युटर बद्दल खूप च गुतूहल असते, त्यामुळे तुम्ही त्यांचे classes घेऊन त्यांना कंप्युटर बद्दल माहिती करायला मदत करू शकता. आणि आज काळ तर प्रत्येक जॉब साठी MSCIT असणे गरजेचे आहे. अशात तुम्ही MSCIT ची देखील ट्रैनिंग देऊ शकता.

15 Village Business Ideas list in Marathi

खालील दिलेले बिजनेस देखील तुम्ही सुरू करू शकता.

  1. डेकोरेशन items बनवण्याचा व्यवसाय
  2. बांगड्यांचा व्यवसाय
  3. शिवणकाम ट्रेनिंग बिझनेस
  4. कपड्याचे दुकान
  5. फळांचे दुकान
  6. पेंटिंग व्यवसाय
  7. चिप्स पापड किंवा लोणचे बनवण्याचा व्यवसाय
  8. मोबाईल,टीव्ही रिपेरिंग शॉप
  9. ट्रैवलिंग एजेंट
  10. बेकरी बिजनेस
  11. हर्बल शेती बिजनेस
  12. स्वीट होम शॉप
  13. शेळीपालन, कुक्कुटपालन
  14. दूध व्यवसाय
  15. हेअर सलून

Village Business Ideas in Marathi शी संबंधित नेहमी विचारले जाणारे प्रश्न (FAQs)

Q. गावामध्ये कोणता बिजनेस चांगला चालू शकेल?

A. गावामध्ये तुम्ही बऱ्याच प्रकारचे बिजनेस सुरू करू शकता. मोटरसायकल रिपेरिंग, हरबल शेती, खाद्य आणि कीटनाशक औषधांचे दुकान,मेडिकल स्टोअर, किराणा मालाचे दुकान, फळांचे दुकान. इत्यादी.

Q. महिलांसाठी गावात कोणता business योग्य आणि चांगला असेल?

A. महिला देखील गावामध्ये स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतात. किराणा मालाचे दुकान, टिफिन सर्विसेस, लोणचे, पापड बिजनेस, ब्युटी पार्लर इत्यादी.

Q. सर्वात कमी भांडवलात कोणता बिजनेस करू शकतो?

A. तुम्ही तुमच्या घरीच ट्युशन क्लासेस सुरू करू शकता, त्यासाठी तुम्हाला कुठल्याही भांडवलाची आवश्यकता भासणार नाही. त्याचबरोबर शिलाई करणे, केटरिंग सर्विसेस, चिप्स बनवणे, इत्यादी व्यवसाय देखील तुम्ही कमी भांडवलामध्ये करू शकता.

Q. असा कोणता व्यवसाय आहे जो 12 महिने चालतो?

12 महिने चालणाऱ्या बिझनेस मध्ये तुम्हाला कधीच नुकसान होणार नाही. यामध्ये किराणा मालाचे दुकान, मेडिकल स्टोअर, दुग्ध व्यवसाय, बेकरी स्टोअर, इत्यादी व्यवसाय सामील आहेत.

धन्यवाद.

देखील वाचा

Gym Business Plan in Marathi

नमस्कार मित्रांनो marathiyojana.com या वेबसाईट वर तुमचे स्वागत आहे. मित्रांनो आज काल सर्व गोष्टी ऑनलाईन झाल्या आहेत, म्हणजे बघा आज काल आपण घर बसल्याच आपल्याला मोबईल च्या साहाय्याने सर्व महत्वाची माहिती मिळून जाते. आपले भारतीय सरकारआपल्या सर्वांसाठी नवनवीन योजना आणत असतो. आणि त्या योजनांचा आपल्याला कसा फायदा करता येईल किव्हा त्या योजनांसाठी नोंदणी कशी करायची या संदर्भात सर्व माहिती तुम्हाला आमच्या या मराठी योजना वेबसाईट वर मळून जाईल.

Leave a Comment