जिम बिझनेस कसा सुरू करावा? | Gym Business Plan in Marathi

आजकालची जनरेशन आपल्या आरोग्याची नेहमी काळजी घेताना दिसते. जिम केल्याने, तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी उत्तम प्रकारे घेऊ शकता. उत्तम आरोग्य हीच खरी संपत्ती अशी म्हण आपल्या इथे रूढ आहे. जर तुम्ही तुमच्या शरीराची योग्य ती काळजी घ्याल, व्यायाम कराल, तर तुम्ही एक चांगली लाईफ जगू शकता. आणि हे फक्त नियमित व्यायाम आणि जिम केल्यामुळेच शक्य आहे.

जर मित्रांनो तुम्हाला देखील हा व्यवसाय करायचा आहे तर, हा बिजनेस तुम्ही कसा स्टार्ट करू शकता? जिम खोलण्यासाठी किती पैसे लागतील? कोणत्या जागेवर जिम खोलावी? जिम खोलण्यासाठी चे नियम कोणते आहेत? जिम खोलण्यासाठी कोण कोणत्या मशिनची आवश्यकता पडते? इत्यादी बद्दल माहिती आजच्या या लेखामध्ये आपण जाणून घेणार आहोत.

जिम बिझनेस कसा सुरू करावा ? । Gym Business Plan in Marathi

Gym Business Plan in Marathi
Gym Business Plan in Marathi

जर मित्रांनो तुम्हाला देखील जिम खोलायची असेल तर तुम्हाला जिम संबंधित माहिती जसे की, जिम साठी कोणकोणत्या सामानाची गरज पडते, जिम साठी कोण कोणत्या प्रोटीनची आवश्यकता असते, जिम ट्रेनर ची फीस काय असते, इत्यादी बद्दल माहिती असणे आवश्यक आहे. यासाठी तुम्हाला तुमचा बजेट देखील लक्षात घ्यावा लागेल. जर तुम्ही देखील जिम बिजनेस सुरू करू इच्छिता तर यासाठी तुम्हाला कमीत कमी 50 लाख रुपये भांडवल गुंतवावे लागू शकतात.

जिम बिजनेस ची डिमांड

कोणताही business man असा व्यवसाय सुरू करू इच्छितो त्याची डिमांड नेहमी कायम असेल. जर जिम बिजनेस बद्दल बोलायचं झालं तर यासाठी तुम्हाला बरीच मोठी रक्कम गुंतवावी लागते. जिम बिझनेस च्या डिमांड बद्दल बोलायचं झालं तर, भारतामध्ये तरुणांची सर्वात जास्त संख्या आहे. आणि येथील तरुणांना आपली फिटनेस संभाळायला आवडते, असे दिसून आले आहे.

आज-काल खाण्यापिण्याच्या सवयी मध्ये बदल झाल्यामुळे, चुकीच्या जीवनशैलीमुळे बरेच लोक हे लठ्ठपणाचे शिकार झालेले आहेत, तर काही जणांचे अजिबात वजन वाढत नाही. अशामध्ये सर्वात जास्त लोकसंख्या असलेला मध्यम वर्ग देखील जिमकडे वळू लागला आहे. याच कारणामुळे आज फिटनेस क्षेत्राशी संबंधित असलेले व्यापार हे मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. आज बऱ्याच मोठमोठ्या जिम कंपन्या बनलेल्या आहेत, ज्यांचे वेगवेगळ्या शहरांमध्ये branches असतात, त्याचबरोबर ह्या लोकांना franchise देखील ऑफर करतात.

त्याचबरोबर काही लोक आपल्या एरियामध्ये, गल्लीमध्ये देखील छोट्या मोठ्या जिम स्टार्ट करून चांगले पैसे कमवत आहेत. यामध्ये टाकलेले भांडवल तुम्ही एका वर्षामध्येच परत मिळवू शकता.

कोणत्या प्रकारची जिम खोलायला हवी?

जिमचे मुख्यतः दोन प्रकार पडतात, पहिली जिम ती असते जी कार्डिओ उपकरणे आणि वेटलिफ्टिंग इत्यादी सुविधा प्रदान करते. ही जिम वजन कमी करणे, बॉडी बनवणे इत्यादी ट्रेनिंग देण्यासाठी उघडली जाते.

दुसरा प्रकार असतो, तो म्हणजे फिटनेस सेंटर म्हणजे वजन कमी करणे, वजन वाढवणे, योगा, एरोबिक्स, मार्शल आर्ट, इत्यादी गोष्टी शिकवल्या जातात. फिटनेस सेंटरचा बिजनेस जिमच्या तुलनेमध्ये थोडा महाग पडू शकतो.

स्थानिक मार्केटचा रिसर्च करणे

जिम सुरू करणाऱ्या व्यावसायिकाला सर्वप्रथम स्थानिक मार्केटचा रिसर्च करणे खूप गरजेचे आहे. यामुळे बरीच माहिती तुम्हाला मिळते. जसे की तुम्ही ज्या लोकेशन मध्ये जिम खोलू इच्छिता तिथे, कोणत्या वयोगटाचे लोक राहतात, जसे की तरुण वर्गाला जिममध्ये जाणे अधिक आवडते. अशा ठिकाणी जिम उघडणे हे खूप फायद्याचे असते.

मार्केट रिसर्च केल्यामुळे तुम्हाला लोकांची मेंटॅलिटी समजते, त्या प्रकारे त्या जागेवर कोणत्या प्रकारची जिम उघडणे फायद्याचे असेल हे कळते. मार्केट रिसर्चमध्ये तुम्हाला ही एक गोष्ट देखील, लक्षात घेणे गरजेचे आहे ती म्हणजे त्या एरियामध्ये सर्वप्रथम किती जिम आधीपासून आहेत. जर त्या एरियामध्ये आधीपासून जास्त जिम असतील तर तिथे जिम उघडणे तुमच्यासाठी फायद्याचे नक्कीच नसेल.

योग्य स्थान निवडणे

जिम उघडण्यासाठी योग्य स्थान निवडणे हे खूप गरजेचे आहे. तुम्ही एखाद्या गल्लीमध्ये देखील जिम उघडू शकता, त्या ठिकाणी पार्किंगची सुविधा असणे गरजेचे नाही. एक चांगली आणि प्रशस्त जिम खोलण्यासाठी कमीत कमी 2000 ते 2500 स्क्वेअर फिट च्या प्लॉटची आवश्यकता असते. बाकी तुमच्या बजेटनुसार तुम्ही हे कमी जास्त करू शकता.

जिम खोलण्यासाठी रजिस्ट्रेशन

सरकारी नियमानुसार जिम खोलण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक असते. जिमचे रजिस्ट्रेशन स्मॉल स्केल इंडस्ट्रीच्या अंतर्गत केले जाते. यासाठी तुम्हाला जिल्ह्याच्या उद्योग विभागाकडून फॉर्म घेऊन तो फॉर्म भरावा लागतो. नमूद केलेल्या सर्व अटी मान्य केल्यानंतर तुम्हाला जिम खोलण्याचे लायसन्स प्राप्त होते. सर्वात आधी तुम्हाला यासाठी एक अस्थाई लायसन्स दिले जाते. काही महिन्यानंतर तुम्ही यामध्ये स्थायी लायसन्ससाठी अप्लाय करू शकता.

जिम खोलण्यासाठी आवश्यक असणाऱ्या मशिनरी

जर तुम्ही एक सामान्य जिम खोलता तर त्यासाठी कमीत कमी 15 मशीनची गरज असते. जिम खोलण्यासाठी ज्या मशीनची आवश्यकता असते त्यामध्ये ट्रेडमिल, बेंच प्रेस, लेग प्रेस, लेट पूल डाउन, बटरफ्लाय, केबल क्रॉसओवर, डीप बार, प्रिचर बेंच, सीटअप बेंच, दोन नॉर्मल बेंच, योगामॅट स्किपिंग रोप, रॉड, डबल स्टॅन्ड इत्यादी महत्त्वपूर्ण आहेत.

या मशीन मध्ये सगळ्यात महागडी मशीन ही ट्रेड मिल असते, कारण ट्रेडमिलवर धावले जाते. जर आपल्या जिम बिझनेससाठी चांगल्या कॉलिटीची ट्रेडमिल घ्यायची झाली तर तिची किंमत जवळपास एक लाख रुपये पर्यंत आहे. याव्यतिरिक्त तुम्हाला इतरही काही गोष्टींची आवश्यकता असते, जसे की लाईट, म्युझिक सिस्टीम, इंटरियर डेकोरेशन इत्यादीवर तुम्हाला थोडाफार खर्च करावा लागेल.

जिमसाठी लागणाऱ्या मशीन कोठून खरेदी कराव्यात?

जिमसाठी लागणाऱ्या मशीन तुम्ही मोठमोठ्या कंपनीकडून खरेदी करू शकता. शहरामध्ये बरेच मोठे शोरूम्स आहेत, जे जिमसाठी आधुनिक प्रकारच्या मशिन्स तयार करतात आणि विकतात. तुम्ही ऑनलाईन देखील या मशीन्सची खरेदी करू शकता. इंटरनेटवर वेगवेगळ्या वेबसाईटवर सर्च करून तुम्ही तुमच्या बजेटनुसार मशीन्स खरेदी करू शकता.

जर तुम्ही प्रशिक्षित नसाल तर काय करावे?

जेव्हा तुम्ही एखादी जिम किंवा फिटनेस सेंटर सुरू करता त्यावेळेस तुम्हाला त्यामध्ये प्रशिक्षित असणे गरजेचे असते. जर तुम्ही प्रशिक्षित नसाल तर यासाठी तुम्ही ट्रेनर किंवा coach ची मदत देखील घेऊ शकता.

जर तुम्हाला तुमच्या ग्राहकांना आकर्षित करायचे असेल तर यासाठी तुम्हाला स्वतःला आधी बॉडी बनवावी लागेल व फिट रहावे लागेल. कारण जो कोणी व्यक्ती जिम किंवा फिटनेस सेंटरवर येतो तो सर्वप्रथम संचालक किंवा ट्रेनर ची बॉडी बघतो. जर तुमची बॉडी चांगली नसेल तर तुमचं पहिलंच इम्प्रेशन हे खराब पडेल.

जिमची मार्केटिंग करणे 

जेव्हा तुम्ही कोणता बिजनेस सुरू करता त्यासाठी मार्केटिंग करणे खूपच आवश्यक असते, मग तो बिझनेस छोटा किंवा मोठा असला तरीही मार्केटिंग तेवढेच गरजेचे आहे. जर तुम्ही मार्केटिंग केले नाही तर लोकांना तुमच्या बिजनेस बद्दल समजणार नाही.

तुम्हाला तुमच्या जिम किंवा फिटनेस सेंटरचा प्रचार असा करायचा आहे जेणेकरून लोक आकर्षित होऊन त्यामध्ये नक्की ॲडमिशन घेतील. यासाठी तुम्ही जागोजागी तुमच्या एरियामध्ये मोठ-मोठे होर्डिंग लावू शकता. आजकाल असे कोणीही नाही जे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म चा उपयोग करत नाहीत. यामुळेच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आजच्या काळात मार्केटिंग साठी एक खूपच लोकप्रिय माध्यम बनलेले आहे.

याबरोबरच लोकल न्यूज चैनल किंवा पेपरमध्ये देखील तुम्ही जाहिरात देऊ शकता. कमी खर्चामध्ये मिळणारे पॅम्प्लेट देखील तुम्ही घरोघरी वाटू शकता.

वेगवेगळे कॉलेजेस हॉस्पिटल इत्यादी मध्ये तुम्ही प्रमोशन करून नक्कीच चांगला फायदा मिळवू शकता. आपल्या जिममध्ये स्टीम बाथ, डायटीशियन फॅसिलिटी अशा अतिरिक्त सुविधा देऊन लोकांना आकर्षित करू शकता.

जिम खोलण्यासाठी एक महिन्याचा किती खर्च येतो ?

जर तुम्ही जिमसाठी जागा भाड्याने घेतली तर त्याचे भाडे कमीत कमी 15 हजार रुपये महिना इतके असेल. याबरोबरच 10 हजार लाईट बिल, 15000 ट्रेनरचे आणि दहा हजार रुपये इतर कर्मचाऱ्यांचा पगार असा जवळपास 50 हजार रुपये खर्च येऊ शकतो.

याबरोबरच 20 हजार रुपये तुम्हाला इतर मशीनचे देखील जोडावे लागतील म्हणजेच जवळपास 70 हजार रुपये महिन्याला खर्च येऊ शकतो.

जिम खोलण्यासाठी लागणारे भांडवल

तुम्हाला जिम खोलण्यासाठी जवळपास 2.5 ते 3 हजार स्क्वेअर फिट एरियाची आवश्यकता लागू शकते. यासाठी तुम्हाला 50 ते 80 लाख रुपये पर्यंत भांडवल लागू शकते. कारण जागेबरोबरच जिमचे इंटेरियर, उपकरणे, मार्केटिंग इत्यादी खर्च यामध्ये ऍड होईल. आणि म्हणूनच जर तुम्हाला देखील हा बिजनेस सुरू करायचा असेल तर कमीत कमी 80 ते 90 लाख रुपये भांडवल लागू शकते. कारण हा बिजनेस एका मोठ्या लेवलवर होतो, छोटे जिम खोलले जात नाहीत.

जिमची किती फीज असते?

जर तुम्ही कोणत्याही जिम मध्ये गेला नसाल तर तुमच्या एरियातल्या कुठल्याही जिम मध्ये जाऊन फीज बद्दल चौकशी करू शकता आणि त्याप्रकारे fees ठेवू शकता. तसे पाहायला गेले तर दरमहा 1000 रुपये एवढी fees तुम्ही घेऊ शकता. जर तुमच्या जिममध्ये नियमितपणे 200 लोकं जरी आले तरी तुम्हाला महिन्याला 2 लाख रुपये मिळू शकतात. जर महिन्याचा एक लाख रुपये खर्च बाजूला जरी ठेवला तरीसुद्धा एक लाख रुपये तुम्हाला नफा मिळू शकतो.

जिम बिझनेस सुरू करण्याआधी लक्षात ठेवायच्या काही गोष्टी 

GYM Information in Marathi
GYM Information in Marathi

जेव्हा तुम्ही जिमसाठी जागा भाड्याने घेता, त्याआधी जागा मालकासोबत चांगल्या प्रकारे बोलून घ्या, कारण जिमसाठी मोठमोठ्या वजनदार मशीन्स ची आवश्यकता असते ज्या तिथे इन्स्टॉल केल्या जातात. जर यानंतर जागा मालकाने लगेचच जागा खाली करायला लावली तर तुम्हाला मोठी अडचण येऊ शकते.

ज्यावेळेस जिम मध्ये तुमच्याकडे ऍडमिशन येतात, त्यावेळेस लोकांना त्यांचे हेल्थ सर्टिफिकेट जरूर मागा. कारण जर कोणत्या व्यक्तीला स्वास्थ्य संबंधित काही प्रॉब्लेम असेल तर भविष्यात काही दुखापत झाल्यास तो तुम्हाला ब्लेम करू शकणार नाही.

जर तुम्ही जिम बिझनेस सोबत सप्लीमेंटचा देखील बिझनेस सुरू करत आहात तर यासाठी तुम्हाला चांगल्या क्वालिटीचे प्रॉडक्टच विकावे लागतील अन्यथा याचा तुमच्या जिमवर चुकीचा प्रभाव पडू शकतो.

निष्कर्ष | Conclusion

मित्रांनो या आर्टिकल मध्ये जिम सेंटर कसे उघडावे? (Gym business plan in Marathi) बद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे. जर तुम्ही वरील सर्व गोष्टींचे पालन करून हा बिजनेस केलात तर नक्कीच तुम्हाला यामध्ये फायदा मिळू शकतो. आम्ही आशा करतो की हा लेख तुम्हाला नक्की आवडला असेल. जर या लेखासंबंधी तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मार्फत आम्हाला नक्की विचारा.

धन्यवाद.

हे देखील वाचा: 

Delivery Boy Job Information in Marathi

Information About MBA Course In Marathi

नमस्कार मित्रांनो marathiyojana.com या वेबसाईट वर तुमचे स्वागत आहे. मित्रांनो आज काल सर्व गोष्टी ऑनलाईन झाल्या आहेत, म्हणजे बघा आज काल आपण घर बसल्याच आपल्याला मोबईल च्या साहाय्याने सर्व महत्वाची माहिती मिळून जाते. आपले भारतीय सरकारआपल्या सर्वांसाठी नवनवीन योजना आणत असतो. आणि त्या योजनांचा आपल्याला कसा फायदा करता येईल किव्हा त्या योजनांसाठी नोंदणी कशी करायची या संदर्भात सर्व माहिती तुम्हाला आमच्या या मराठी योजना वेबसाईट वर मळून जाईल.

Leave a Comment