डिलिव्हरी बॉय ची नोकरी कशी मिळवावी | Delivery Boy Job Information in Marathi

नमस्कार मित्रांनो, आजच्या काळामध्ये नोकरी मिळवणं हे खूपच कठीण काम आहे. आणि ज्यामुळे मोठ्या संख्येमध्ये बेरोजगार लोकं आपल्याला आपल्या भारतात पाहायला मिळत आहेत. जे लोक नोकरीच्या शोधात आहेत व नोकरी करू इच्छितात, ते डिलिव्हरी बॉय ची नोकरी करून चांगले पैसे कमावू शकतात. आजच्या काळामध्ये बऱ्याच प्रकारच्या प्रॉडक्ट डिलिव्हरी कंपन्या आहेत , ज्या ऑनलाइन प्रोडक्ट विकण्याचे काम करतात.

ह्या प्रोडक्ट्स ना डिलिव्हरी करणाऱ्या कंपन्यांमध्ये ई-कॉमर्स कंपनी, फूड डिलिव्हरी कंपनी आणि कुरिअर कंपन्या समाविष्ट आहेत, जे आपल्या प्रॉडक्ट ऑर्डरला कस्टमरच्या घरापर्यंत पोहोचवण्याचे काम करतात. आणि हे काम करण्यासाठी या कंपन्यांना डिलिव्हरी बॉय ची आवश्यकता असते, यासाठी या कंपन्या डिलिव्हरी बॉय हायर करतात.

या डिलिव्हरी बॉय द्वारे प्रॉडक्ट ला ग्राहकांच्या घरापर्यंत पोहोचवण्याच्या बदल्यात या कंपन्या त्यांना कमिशन देऊ करतात. प्रत्येक डिलिव्हरी बॉय ला एका डिलिव्हरीवर काही ना काही कमिशन मिळत असते आणि या प्रकारे डिलिव्हरी बॉय प्रोडक्टची डिलिव्हरी करून चांगल्या प्रकारे इन्कम प्राप्त करू शकतो. जर तुम्हाला सुद्धा डिलिव्हरी बॉय ची नोकरी हवी असेल, तर आजचा हा आर्टिकल तुम्ही पूर्ण वाचा. ज्यामध्ये डिलिव्हरी बॉय (delivery boy) ची नोकरी कशी मिळवावी? त्याचबरोबर पात्रता आणि ऑनलाईन अर्ज याबद्दल आम्ही तुम्हाला माहिती सांगणार आहोत.

डिलिव्हरी बॉय ला कुरियर बॉय देखील संबोधले जाते. हे एक असे काम आहे जिथे व्यक्तीला एखादे प्रॉडक्ट डिलिव्हर करण्यासाठी ठेवले जाते. आजच्या काळामध्ये अशा शेकडो कंपन्या आहेत ज्या ग्राहकांना त्यांचं प्रॉडक्ट घरापर्यंत पोहोचवण्याची सुविधा देतात, ज्यासाठी त्यांना डिलिव्हरी बॉय ची आवश्यकता असते. तुम्ही तुमच्या इच्छेनुसार ई-कॉमर्स कंपन्या जसे की ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, मिंत्रा, स्नॅपडील, मिशो, किंवा फूड डिलिव्हरी करणाऱ्या कंपन्या स्विगी, झोमॅटो मध्ये डिलिव्हरी बॉय चे काम करू शकता. तुम्हाला ज्या कोणत्या कंपनीमध्ये डिलिव्हरी बॉय चे काम करायचे आहे अशा कंपनीच्या जवळच्या सेंटरवर जाऊन तुम्ही ऑफलाईन अर्ज देखील करू शकता.

जर कंपनीच्या सेंटर मध्ये डिलिव्हरी बॉय साठी जागा रिकाम्या असतील तर तुम्हाला लगेच नोकरी मिळून जाईल, आणि जर वेकेन्सी नसतील तर तुम्हाला ती कंपनी नंतर संपर्क करेल. म्हणून तुम्ही कंपनीच्या सेंटरवर जाऊन नक्कीच अर्ज करा. जर तुम्हाला अशा कंपन्याचं सेंटर माहिती नसतील तर तुम्ही गुगल वरती चेक करू शकता, किंवा याबद्दल इतर डिलिव्हरी बॉय ला विचारू शकता.

How to get a Delivery boy job in Marathi

How to get a Delivery boy job in Marathi
How to get a Delivery boy job in Marathi

डिलिव्हरी बॉय च्या जॉब मध्ये काय काम करावे लागते?

जवळपास सर्व कंपन्यांमध्ये डिलिव्हरी बॉय चे काम एकसारखेच असते, परंतु कंपन्यांचे प्रॉडक्ट वेगवेगळे असू शकतात. आता आम्ही तुम्हाला कोणत्या कंपनीमध्ये कोणत्या प्रकारचे प्रॉडक्ट डिलिव्हर करावे लागू शकतात याबद्दल माहिती सांगणार आहोत :-

ई-कॉमर्स कंपनी प्रोडक्ट

जर तुम्ही ई-कॉमर्स कंपनी जसे की ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, मिंत्रा किंवा स्नॅपडील या कंपन्यांमध्ये काम करत असाल, तर तुम्हाला कस्टमरच्या घरी जाऊन ते प्रॉडक्ट डिलिव्हर करावे लागेल. या कंपन्यांमध्ये बऱ्याच प्रकारचे प्रॉडक्ट असतात, जे डिलिव्हर बॉय ला डिलिव्हर करावे लागतात. जर तुम्ही या कंपन्यांमध्ये नोकरी मिळवता तर तुम्ही खूप चांगली कमाई करू शकता.

फूड डिलिव्हरी कंपनी

जर तुम्ही फूड डिलिव्हर कंपनी जसे की स्विगी, झोमॅटो किंवा इतर कंपनीमध्ये नोकरी करायची असेल तर तुम्हाला ग्राहकांपर्यंत फूड ऑर्डर पोहोचवावी लागते. अशा प्रकारच्या कंपन्यांमध्ये काम करणारे डिलिव्हरी बॉय ला खूप जबाबदारीने फूड डिलिव्हर करावे लागते कारण की यामध्ये एक निर्धारित वेळ तुम्हाला दिलेली असते, आणि त्या वेळेमध्येच तुम्हाला ग्राहकांपर्यंत ती ऑर्डर पोहोचवावी लागते.

मेडिकल फार्मसी कंपनी

जर तुम्ही मेडिकल फार्मसी कंपनी जसे की , 1MG, netmeds, pharmeasy इत्यादी मध्ये नोकरी करू इच्छिता तर तुम्हाला ग्राहकांपर्यंत मेडिकलशी संबंधित असलेल्या गोष्टी डिलिव्हर कराव्या लागतात. आजकाल बऱ्याच कंपन्या ग्राहकांना त्यांच्या घरपोच गोळ्या – औषधं पोहोचवण्याचं काम करते, यासाठी या कंपन्यांना देखील डिलिव्हरी बॉईज ची आवश्यकता असते.

कुरियर कंपनी

काही कंपन्या अशा आहेत, ज्या आपल्या प्रॉडक्ट ला ई-कॉमर्स वेबसाईट शिवाय ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करते. कारण आजच्या काळात डिलिव्हरी करण्यासाठी बऱ्याच प्रकारच्या सुविधा उपलब्ध आहेत. आणि म्हणूनच बऱ्याचशा कंपन्या आपल्या प्रोडक्सला डायरेक्ट कस्टमर पर्यंत डिलिव्हर करतात, यासाठी या कंपन्या कुरिअर कंपन्यांची मदत घेतात. कुरियर कंपनीमध्ये DTDC, Delhivery, Blue Dart, FedEx इत्यादी कंपन्यांचा समावेश होतो, ज्यामध्ये काम करणारे डिलिव्हरी बॉय, प्रॉडक्ट ग्राहकांपर्यंत डिलिव्हर करतात. तुम्ही या कंपन्यांमध्ये देखील जॉब साठी Apply करू शकता.

Delivery Boy Eligibility in Marathi

डिलिव्हरी बॉय बनण्यासाठी पात्रता

1) डिलिव्हरी बॉय जॉब मिळवण्यासाठी तुमच्याकडे कमीत कमी दहावी उत्तीर्ण सर्टिफिकेट असणे गरजेचे आहे.

2) अर्ज करण्यासाठी तुमचे वय 18 वर्ष असणे गरजेचे आहे.

3) अर्जधारकाकडे एक स्मार्टफोन असणे गरजेचे आहे, जो त्याला व्यवस्थित हाताळता येत असेल.

4) आवेदन करताना इंग्रजी त्याचबरोबर स्थानिक भाषेचे ज्ञान असणे गरजेचे आहे.

5) त्याचबरोबर आवेदन कर्त्याकडे स्वतःचे वाहन जसे की बाईक किंवा स्कूटर असणे गरजेचे आहे.

6) अर्जधारकाकडे गाडीचे सर्व अधिकृत डॉक्युमेंट्स असणे गरजेचे आहे. जसे की :- RC, driving licence, insurance, etc.

7) प्रॉडक्ट डिलिव्हर करतेवेळी ट्राफिक पोलिसांशी वाद टाळण्यासाठी तुमच्याकडे सर्व कागदपत्रे असणे गरजेचे आहे.

जर तुम्ही या सर्व अटी पूर्ण करता तर तुम्ही डिलिव्हरी बॉय बनू शकता.

Delivery Boy Documents in Marathi

डिलिव्हरी बॉय बनण्यासाठी लागणारे डॉक्युमेंट्स

1) अर्जकरत्याकडे सर्व पर्सनल डॉक्युमेंट्स जसे की, पॅन कार्ड (PAN card), आधार कार्ड (Aadhar card), वोटर आयडी (Voter Id) आणि बँक अकाउंट असणे गरजेचे आहे.

2) अर्जकर्त्याकडे दहावी पास चे मार्कशीट असणे गरजेचे आहे .

3) तुम्ही दिलेल्या बँक अकाउंट मध्ये तुमची सॅलरी जमा होते.

Delivery Boy Working Benefits in Marathi

डिलिव्हरी बॉय जॉब करण्याचे फायदे: 

1) डिलिव्हरी बॉय जॉब करण्याचा सगळ्यात मोठा फायदा हा आहे की, डिलिव्हरी बॉय चा जॉब तुम्ही फुल टाइम व्यतिरिक्त पार्ट टाइम मध्ये देखील करू शकता.

2) पार्ट टाइम डिलिव्हरी बॉय चे काम करून तुम्ही तुमच्या इतर स्किल्सवर इतर जॉब देखील करू शकता.

3) डिलिव्हरी बॉय च्या कामामध्ये तुम्हाला गाडीवर फिरून काम करायचे असते ज्यामुळे तुम्हाला या कामाचा अजिबात कंटाळा येणार नाही.

4) तुम्ही तुमच्या घराजवळच्या क्षेत्रात डिलिव्हरी बॉय चे काम करू शकता.

5) डिलिव्हरी बॉय जॉब मध्ये तुम्हाला सॅलरी बरोबरच इतर इन्सेंटिव्ह त्याचबरोबर बाईकच्या पेट्रोलचा खर्च देखील दिला जातो.

Delivery Boy Salary information in Marathi

डिलिव्हरी बॉय चा पगार: डिलिव्हरी बॉय च्या पगाराबद्दल बोलायचे झाले तर सर्व कंपनीमध्ये डिलिव्हरी बॉय ला वेगवेगळा पगार असू शकतो. तरीसुद्धा एक डिलिव्हरी बॉय दर महिने 10 ते 25 हजार रुपये कमवू शकतो. जर एखादा व्यक्ती ऍमेझॉन सारख्या मोठ्या कंपनीमध्ये डिलिव्हरी बॉय चे काम करत असेल तर तो दर महिन्याला 50 ते 60 हजार रुपये देखील कमवू शकतो. याचे कारण असे की ॲमेझॉन कंपनी प्रत्येक प्रॉडक्टच्या डिलिव्हरी मागे दहा ते पंधरा रुपये incentives प्रदान करते. पण या कंपनीमध्ये पेट्रोलचा खर्च दिला जात नाही तो स्वतःला करावा लागतो.

सर्व डिलिव्हरी कंपन्या, डिलिव्हरी बॉय ला वेगवेगळी सॅलरी देतात. हे सर्वतः तुमच्या कंपनीवर डिपेंड करते की तुम्ही कोणत्या कंपनीमध्ये जॉब करत आहात. पण बऱ्याचशा कंपन्यांमध्ये दोन प्रकारे सॅलरी ऑफर केली जाते. एक म्हणजे मंथली बेसिस तर दुसरे प्रोडक्ट बेसिस. मंथली बेसिस मध्ये डिलिव्हरी बॉय ला महिन्याच्या शेवटी एक निश्चित सॅलरी दिली जाते. याउलट प्रॉडक्ट बेसिस मध्ये डिलिव्हरी बॉय ला कोणतीही निश्चित सॅलरी दिली जात नाही. यामध्ये डिलिव्हरी बॉय ला प्रत्येक प्रोडक्ट नुसार पैसे दिले जातात. म्हणजे तुम्ही जेवढे जास्त प्रॉडक्ट डिलिव्हर करतात तेवढे जास्त पैसे तुम्हाला मिळतात.

Delivery Boy Apply Online in Marathi

डिलिव्हरी बॉय बनण्यासाठी ऑनलाईन अर्ज

1) जर तुम्हाला डिलिव्हरी बॉय बनण्यासाठी ऑनलाइन एप्लीकेशन करायचे असेल तर तुम्हाला त्या कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन Online Apply करावे लागेल.

2) सर्वप्रथम वेबसाईटच्या होम पेजवर जाऊन, delivery person Apply online वर क्लिक करा.

3) यानंतर डिलिव्हरी बॉय च्या ऑनलाईन एप्लीकेशन फॉर्म वर किल्क करून सर्व माहिती भरा.

4) यानंतर आवश्यक असलेली डॉक्युमेंट्स स्कॅन करून अपलोड करा.

5) यानंतर संपूर्ण फॉर्म भरल्यानंतर, कंपनीचे कर्मचारी तुम्हाला संपर्क करतील व पुढील प्रक्रियेबद्दल सांगतील.

याव्यतिरिक्त जर तुम्ही ऑफलाइन कोणत्या कंपनीमध्ये अर्ज करू इच्छिता तर त्या कंपनीच्या सेंटरमध्ये जाऊन तुम्ही याबाबतीत चौकशी करू शकता.

FINAL WORDS

जर या कंपनीमध्ये डिलिव्हरी बॉयसाठी vacancy असेल, तर तुम्हांला hire करण्यात येईल. अशाप्रकारे डिलीव्हरी बॉय बनण्यासाठी तुम्ही online किंवा ऑफलाईन अर्ज करू शकता. आजच्या या लेखामध्ये आपण डिलिव्हरी बॉय ची नोकरी कशी मिळवावी? यासाठी लागणारी पात्रता आणि ऑनलाईन अर्ज , डिलिव्हरी बॉय सॅलरी इत्यादी संबंधित माहिती जाणून घेतली. आम्ही आशा करतो की वरील लेख आपल्याला आवडला असेल.

धन्यवाद.

हे देखील वाचा

Maharashtra Atal Saur Krishi Pump Yojana

नमस्कार मित्रांनो marathiyojana.com या वेबसाईट वर तुमचे स्वागत आहे. मित्रांनो आज काल सर्व गोष्टी ऑनलाईन झाल्या आहेत, म्हणजे बघा आज काल आपण घर बसल्याच आपल्याला मोबईल च्या साहाय्याने सर्व महत्वाची माहिती मिळून जाते. आपले भारतीय सरकारआपल्या सर्वांसाठी नवनवीन योजना आणत असतो. आणि त्या योजनांचा आपल्याला कसा फायदा करता येईल किव्हा त्या योजनांसाठी नोंदणी कशी करायची या संदर्भात सर्व माहिती तुम्हाला आमच्या या मराठी योजना वेबसाईट वर मळून जाईल.

Leave a Comment