महाराष्ट्र श्रावणबाळ योजना | Shravan Bal Yojana Mahiti

मित्रांनो एकविसाव्या शतकामध्ये आपण बरीच वैज्ञानिक, वैयक्तिक प्रगती तर केली, पण भारतामधील कुटुंब प्रणालीचा ऱ्हास होऊ लागला आहे. भारतामध्ये तथा महाराष्ट्रात वृद्धांची स्थिती दिवसेंदिवस खूपच दयनीय होत चालली आहे. परिवारातील वृद्ध माणसांना, त्यांचीच मुले आजकाल अपमानित करत आहेत. एका सर्वेक्षणानुसार असे दिसून आले आहे की जवळपास 71 % वृद्ध हे आजारी असताना त्यांच्या परिवाराकडून त्यांची काळजी घेतली जात नाही आणि म्हणूनच महाराष्ट्र सरकारने श्रावणबाळ योजनेची सुरुवात केलेली आहे.

मित्रांनो आजच्या या लेखांमध्ये आपण महाराष्ट्र सरकार द्वारा सुरू करण्यात आलेल्या श्रावणबाळ योजनेबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. श्रावण बाळ योजना म्हणजे नक्की काय आहे? याचा उद्देश, लाभ, सुविधा, पात्रता, आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, लाभार्थी यादी, पेमेंट स्टेटस कसे चेक करायचे? आणि ह्या योजनेबद्दल आपण इतर संबंधित माहिती देखील जाणून घेणार आहोत. त्यामुळे श्रावणबाळ योजनेबद्दल पूर्णपणे माहिती जाणून घेण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी कृपया हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.

महाराष्ट्र श्रावण बाळ योजना 2023 – 24

वृद्ध अवस्थेमध्ये असणाऱ्या त्याचबरोबर देशातील ज्येष्ठ व्यक्तींची महत्त्वपूर्ण परिस्थिती लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने श्रावण बाळ योजना सुरू केलेली आहे. राज्यातील वृद्ध व्यक्तींना आर्थिक सहाय्य या योजनेतून मिळणार आहे. जे सेवानिवृत्त झालेले आहेत किंवा ज्यांचे वय 65 वर्षाहून अधिक आहे अशांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. या योजनेनुसार अशा वृद्धांना दर महिन्याला 400 ते 600 रुपये देण्याचा दावा सरकारने केलेला आहे. यामुळे देशातील वृद्ध व्यक्तींना आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र, सक्षम बनवण्यात मदत होणार आहे. या वृद्धांसाठीच्या योजनेचा पूर्ण लाभ घेण्यासाठी तुम्ही महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाइन या योजनेसाठी अर्ज करू शकता. याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.

महाराष्ट्र श्रावण बाळ योजना मुख्य उद्देश

वृद्धावस्थेमध्ये असणाऱ्या लोकांना आर्थिक सहाय्य प्रदान करणे हा महाराष्ट्र श्रावण बाळ योजनेचा मुख्य उद्देश आहे. त्यांनी सेवानिवृत्तीचे वय ओलांडले आहे किंवा ज्यांचे वय 65 वर्षांहून अधिक आहे अशांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. या पेन्शन योजनेद्वारे वृद्धावस्थेमध्ये असणारे नागरिक त्यांच्या म्हातार  पणात आर्थिक दृष्ट्या स्वतंत्र होणार आहेत. त्यांचा त्रास कमी कमी होणार असून, घरातल्या कोणावरही त्यांना आर्थिक दृष्ट्या निर्भर राहण्याची गरज उरणार नाही.

श्रावणबाळ योजना 2023-2024 लाभ आणि सुविधा

1) या योजनेअंतर्गत महाराष्ट्र सरकार राज्यातील वृद्ध लोकांना दर महिने 600 रुपये आर्थिक सहाय्य प्रदान करणार आहे.

2) महाराष्ट्र सरकारच्या या श्रावणबाळ योजनेच्या यशस्वी अंमलबजावणी मुळे आपल्या राज्यातील वृद्ध लोक हे आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी होतील अशी अपेक्षा आहे.

3) या योजनेमुळे वृद्ध नागरिकांना आपल्या गरजा भागवण्यासाठी इतरांवर अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही.

4) महाराष्ट्रातील वृद्ध लोक, श्रावण बाळ योजनेच्या अंमलबजावणीमुळे आर्थिक समस्यांना दूर करू शकतील.

5) महाराष्ट्र श्रावण बाळ योजनेमध्ये Category A आणि Category B अशा दोन `श्रेणी असतील. श्रेणी अ मध्ये Below Poverty Line यादीत नाव नसणारे लोक असतील, तर श्रेणी ब मध्ये Below Poverty Line यादीत नाव असणारे लोक असतील.

वृद्धावस्था सहाय्य योजनेनुसार श्रेणी 

वृद्धावस्था सहाय्य योजनेनुसार श्रेणी 
वृद्धावस्था सहाय्य योजनेनुसार श्रेणी

श्रावणबाळ योजनेबद्दल अधिक संबंधित माहिती जोडताना, महाराष्ट्र श्रावणबाळ योजना 2023-2024 अंतर्गत दोन श्रेणी आहेत. या योजनेत दोन वर्ग श्रेणी A(Category A) आणि श्रेणी B(Category B) अंतर्गत विभागलेले आहेत. ज्या लाभार्थींचे नाव श्रेणी A(Category A) मध्ये समाविष्ट आहे आपल्या शासनाकडून दरमहा रुपये 600 मिळतील. श्रेणी A अर्जदार हे, ते लाभार्थी असतील ज्यांची नावे बीपीएल यादीमध्ये सूचीबद्ध नसेल , तर श्रेणी B मध्ये असे लोक असतील ज्यांची नावे बीपीएल यादीमध्ये समाविष्ट किंवा सूचीबद्ध आहेत. ब श्रेणीतील अर्जदारांना इंदिरा गांधी वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजनेंतर्गत राज्य सरकारकडून दरमहा 400 रुपये आणि केंद्र सरकारकडून 200 रुपये दरमहा मिळतील.

श्रावणबाळ योजनेसाठी पात्रता मार्गदर्शक तत्त्वे

बीपीएल कार्ड नुसार श्रेणीची विभागणी केली गेलेली आहे, आणि यामुळेच दोन्ही श्रेणीसाठी पात्रता दिशानिर्देश वेगवेगळे आहेत. महाराष्ट्र वृद्धावस्था सहाय्य योजना किंवा महाराष्ट्र श्रावणबाळ योजनेनुसार निर्धारित केलेले पात्रता दिशा निर्देश खालील प्रमाणे आहेत.

श्रेणी अ साठी 

1) श्रेणी अ चा जो र्जदार असेल तो कायदेशीर आणि कायमस्वरूपी महाराष्ट्र राज्याचा कायदेशीर रहिवासीअसला पाहिजे.

2) ही योजना फक्त राज्यातील वृद्ध नागरिकांसाठी तयार करण्यात आली आहे, अर्जदाराचे वय ६५ वर्षांपेक्षा जास्त असावे.

3) ही योजना फक्त अशाच ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे ज्यांची आर्थिक स्थिती कमजोर आहे आणि अर्जदाराचे उत्पन्न हे 21,000 पेक्षा जास्त नसावे.

4) बीपीएल यादीत अर्जदाराचे नाव समाविष्ट नसावे

श्रेणी ब साठी 

1) अर्जदार हा महाराष्ट्राचा कायमस्वरूपी व कायदेशीर रहिवासी असणे आवश्यक आहे .

2) महाराष्ट्र श्रावण बाळ योजना ही वृद्ध नागरिकांसाठी असल्या कारणाने, अर्जदाराचे वय 65 किंवा त्यापेक्षा अधिक असणे आवश्यक आहे.

3) अर्जदाराचे उत्पन्न प्रतिवर्ष 21 हजार पेक्षा कमी असावे.

4) अर्जदाराचे नाव बीपीएल यादीमध्ये असणे आवश्यक आहे.

महाराष्ट्र श्रावण बाळ योजना साठी अर्ज कसा करावा?

1) या योजनेचा अर्ज करण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.

2) त्यानंतर तुमच्यासमोर एक होमपेज दिसेल, होमपेज मध्ये तुम्हाला, नोंदणी लिंक वर क्लिक करायचे आहे.

3) तुम्ही पर्याय १ किंवा पर्याय २ मधून नोंदणी करू शकता. जर तुम्ही एक पर्याय निवडला आहे, तर त्यानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा निवडावा लागेल, तुमचा मोबाइल नंबर, ओटीपी आणि Username टाकावे लागेल.

2) जर तुम्ही पर्याय दोन निवडल्यास, तुमच्यासमोर एक नोंदणी फॉर्म उघडेल जिथे तुम्हाला अर्जदाराचे तपशील, अर्जदाराचा पत्ता, मोबाइल क्रमांक, वापरकर्त्याचे नाव, पडताळणी, छायाचित्र, ओळखीचा पुरावा, पत्त्याचा पुरावा इत्यादी सर्व आवश्यक तपशील प्रविष्ट करावे लागतील.

3) त्यानंतर, तुम्हाला रजिस्टर ह्या option वर क्लिक करावे लागेल.

4) आता तुम्हाला Home Page वर  परत जाऊन श्रावणबाळ योजना या लिंकवर क्लिक करावे लागेल.

5) तुम्ही या लिंकवर click केल्यानंतर तुम्हाला  एक लॉगिन फॉर्म दिसेल, जिथे तुम्हाला तुमचे login credentials म्हणजे तुम्हाला तुमचा User ID आणि password टाकावे लागतील आणि सबमिट वर क्लिक करावे लागेल.

6) तुमच्या समोर पुन्हा एक नोंदणी फॉर्म उघडेल, जिथे तुम्हाला तुमचे नाव, संपर्क तपशील, ईमेल आयडी, पत्ता इत्यादी प्रविष्ट करणे आवश्यक आहे.

7) पुढील slide मध्ये , तुम्हाला सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करावे लागतील .

8) आता तुम्हाला तुमचे बँक तपशील जसे की तुमच्या बँकेचे नाव, शाखेचे नाव, IFSC कोड टाकावे लागतील.

9) सर्व तपशील जे तुम्ही एंटर केले आहेत ते एकदा चेक करून submit या बटणावर click करावे लागेल.

10) हा अर्ज यशस्वीरित्या सबमिट केल्यानंतर, एक अर्ज क्रमांक तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला दिसेल.

11) भविष्यातील संदर्भांसाठी तुम्हाला हा अर्ज क्रमांक सुरक्षित ठेवावा लागेल.

तुमच्या अर्जाच्या स्थितीचा मागोवा घेण्यासाठी प्रक्रिया:

1) https://aaplesarkar.mahaonline.gov.in/ या वेबसाइट वर जा. 

2) तुमच्या समोर होम पेज ओपन होईल.

3) पुढे, तुम्हाला तुमचा अर्ज ट्रॅक वर क्लिक करायचे आहे.

4) आता तुम्हाला तुमचा Application ID टाकावा लागेल.

5) त्यानंतर, तुम्हाला go वर क्लिक करावे लागेल.

6) यानंतर तुमच्या अर्जाची स्थिती तुमच्या संगणकाच्या स्क्रीनवर पाहायला मिळेल.

लाभार्थी यादी तपासण्याची प्रक्रिया

1) सर्वप्रथम, तुम्हाला आपल्या महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत वेबसाइटला visit करावे लागेल.

2) तुमच्या समोर होम पेज ओपन होईल.

3)आता पुढे, तुम्हाला लाभार्थी यादी या पर्यायावर click करावे लागेल.

4) आता तुम्हाला तुमचे जिल्हा मंडळ आणि गाव/ब्लॉक निवडायचे आहेत.

5) त्यानंतर सबमिटवर क्लिक करावे.

6) लाभार्थ्यांची यादी तुमच्या संगणकाच्या स्क्रीनवर दिसेल.

मित्रांनो आजच्या या आर्टिकल मध्ये आपण महाराष्ट्र श्रावण बाळ योजना 2023 -24 शी संबंधित सर्व प्रासंगिक आणि आवश्यक माहिती कव्हर केलेली आहे. जर या व्यतिरिक्त आपल्याला काही मदत किंवा माहिती हवी असल्यास तुम्ही सरकारद्वारे प्रोव्हाइड केलेल्या हेल्पलाइन नंबर वर संपर्क करू शकता. तुमच्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला जरूर मिळेल.

महाराष्ट्र श्रावण बाळ योजनेसाठी हेल्पलाइन नंबर: 18001208040.

Conclusion 

आपण आजच्या या आर्टिकल मध्ये महाराष्ट्र श्रावण बाळ योजना 2023 – 24 संबंधित सर्व महत्वपूर्ण माहिती जाणून घेतली आहे. महाराष्ट्र श्रावणबाळ योजनेचा उद्देश, यासाठी लागणारी पात्रता, यामुळे होणारे लाभ, त्याचबरोबर महाराष्ट्र श्रावण बाळ योजनेसाठी अर्ज प्रक्रिया कशी आहे याबद्दल माहिती जाणून घेतली आहे. महाराष्ट्र श्रावणबाळ योजनेबद्दल जर तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.

धन्यवाद.

हे देखील वाचा

Agneepath Yojana information in Marathi

नमस्कार मित्रांनो marathiyojana.com या वेबसाईट वर तुमचे स्वागत आहे. मित्रांनो आज काल सर्व गोष्टी ऑनलाईन झाल्या आहेत, म्हणजे बघा आज काल आपण घर बसल्याच आपल्याला मोबईल च्या साहाय्याने सर्व महत्वाची माहिती मिळून जाते. आपले भारतीय सरकारआपल्या सर्वांसाठी नवनवीन योजना आणत असतो. आणि त्या योजनांचा आपल्याला कसा फायदा करता येईल किव्हा त्या योजनांसाठी नोंदणी कशी करायची या संदर्भात सर्व माहिती तुम्हाला आमच्या या मराठी योजना वेबसाईट वर मळून जाईल.

Leave a Comment