Mukhyamantri Baliraja Vij Savlat Yojana 2024 | मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना

Mukhyamantri Baliraja Vij Savlat Yojana 2024 | मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना

मित्रांनो आजच्या या लेखात आपण मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना या योजनेविषयी माहिती पाहणार आहोत. या योजनेची घोषणा 28 जून 2024 रोजी झालेल्या अर्थसंकल्पात अजित पवार यांनी केली. या योजनेअंतर्गत शेतकऱ्याला वीज बिला पासून सुटका होणार आहे. या योजनेचा राज्यातील शेतकऱ्यांना खूप मोठा फायदा होणार आहे. मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजनेमध्ये शेतकऱ्यांना मोफत वीज दिली जाणार आहे. 28 जून रोजी झालेल्या अर्थसंकल्पात असे सांगितले गेले की 46 लाख 6 हजार कृषी पंप धारक शेतकऱ्यांची वीज बिल मोफत देण्यासाठी मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजनेची घोषणा केली गेली आहे. याकरिता 14 हजार 761 कोटी रुपये अनुदान स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

योजनेचे नाव  मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना
योजनेची सुरुवात 28 जून 2024 रोजी
लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील शेतकरी
अर्ज प्रक्रिया अर्ज करण्याची गरज नाही
योजनेचे  वैशिष्ट्ये राज्यातील 46 लाख 6 हजार कृषी पंप धारकांना मोफत वीज दिली जाणार आहे
लाभ कृषी पंप धारक शेतकऱ्यांची वीज बिल माफी

मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना पात्रता

  • महाराष्ट्र राज्यातील शेतकरीच या योजनेसाठी पात्र असतील.
  • या योजनेचा लाभ हा फक्त शेतकऱ्यांना दिला जाईल.
  • या योजनेअंतर्गत 7.5 विद्युत क्षमतेपर्यंतच्या शेतीपंपांना मोफत वीज दिली जाणार आहे.

मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना अटी व नियम

  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवासी असायला हवा.
  • महाराष्ट्र राज्य बाहेरील लाभार्थ्याला या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
  • या योजनेअंतर्गत थकीत वीज बिल माफ केले जाणार नाही.
  • इथून पुढचे आलेले वीज बिल मोफत असेल.
  • या योजनेअंतर्गत 7.5 एचपी मोटार पेक्षा जास्त म्हणजे 10 एचपी असणाऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.

या योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांचे अगोदरचे विज बिल थकीत आहेत ते विज बिल शेतकऱ्यांना भरावे लागतील या योजनेच्या माध्यमातून ते बिल माफ केले जाणार नाही. पण इथून पुढचे जे वीज बिल आहे हे माफ केले जाणार आहे. या योजनेचा शेतकऱ्यांना खूप मोठा फायदा होणार आहे शेतकऱ्यांना वीज बीला पासून सुटका मिळणार आहे.

मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना अर्ज करण्याची पद्धत

या योजनेचा लाभ घेण्याकरिता लाभार्थी व्यक्तींना अर्ज करण्याची गरज पडणार नाही. कृषी पंपाची वीज जोडणी घेताना ती वीज जोडणी कृषी पंपाची आहे याची माहिती विद्युत विभागाकडे नमूद असते. त्यामुळे कोणती वीज जोडणी कृषी पंपाचे आहे व ती किती एचपी पंपाची आहे याची माहिती शासनाकडे या अगोदरच उपलब्ध असते यामुळे शेतकऱ्यांना स्वतः अर्ज करण्याची गरज पडणार नाही.7.5 कृषी पंप एचपी चे बिल त्यांच्याकडे अगोदरच उपलब्ध आहे त्या माहितीनुसार मोफत विज दिली जाणार आहे.

नमस्कार मित्रांनो marathiyojana.com या वेबसाईट वर तुमचे स्वागत आहे. मित्रांनो आज काल सर्व गोष्टी ऑनलाईन झाल्या आहेत, म्हणजे बघा आज काल आपण घर बसल्याच आपल्याला मोबईल च्या साहाय्याने सर्व महत्वाची माहिती मिळून जाते. आपले भारतीय सरकारआपल्या सर्वांसाठी नवनवीन योजना आणत असतो. आणि त्या योजनांचा आपल्याला कसा फायदा करता येईल किव्हा त्या योजनांसाठी नोंदणी कशी करायची या संदर्भात सर्व माहिती तुम्हाला आमच्या या मराठी योजना वेबसाईट वर मळून जाईल.

Leave a Comment