अग्निपथ योजना काय आहे? | Agneepath Yojana information in Marathi

मित्रांनो आपल्या देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी, देशातील बेरोजगार तरुणांसाठी एक नवीन योजना लॉन्च केलेली आहे. या योजनेचे नाव आहे Agneepath Yojana. या योजनेमध्ये देशातील बेरोजगार तरुणांना कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर 4 वर्षाची अस्थाई नोकरी दिली जाते.

भारताच्या सुरक्षेतेच्या संबंधित असणारे मंत्रिमंडळ त्याचबरोबर समिती कडून मंजुरी मिळाल्यानंतर, सुरक्षा मंत्री राजनाथ सिंह यांनी Agneepath योजनेची 14 जून 2022 रोजी अधिकृत घोषणा केली होती.

अग्निपथ योजनेनुसार ज्या बेरोजगार तरुणांना भारतीय सेनेमध्ये नोकरी करायची असेल, त्यांना 4 वर्षाची temporary म्हणजे अस्थायी नोकरी प्रदान केली जाईल. ज्यानुसार त्यांना पहिल्या वर्षी 30 हजार रुपये मासिक वेतन मिळेल, जे पुढच्या चार वर्षात वाढून 40 हजार रुपयांपर्यंत होईल. ही एक अस्थायी नोकरी असल्या कारणाने देशातील नवतरुण चौताळले आहेत, आणि म्हणूनच बिहार, राजस्थान, हरियाणा, उत्तर प्रदेश, झारखंड, इत्यादी राज्यात हिंसक प्रदर्शने केली गेली.

आजच्या या Agneepath Yojana in Marathi च्या आर्टिकल मध्ये मी तुम्हाला Agneepath योजनेसंबंधी सर्व माहिती, अग्निपथ योजनेचे फायदे, अग्निपथ योजनेचे नुकसान, इत्यादी विषयी सविस्तर माहिती देणार आहोत. या योजनेसंबंधित सर्व माहिती जाणून घेण्यासाठी कृपया हे आर्टिकल शेवटपर्यंत लक्षपूर्वक वाचा.

Agnipath Scheme Details in Marathi

अग्निपथ योजना ही आता अधिकृतपणे लॉन्च झालेली आहे. या योजनेअंतर्गत निवडलेल्या उमेदवारांना “अग्निवीर” म्हणून ओळखले जाईल. ही भारत सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे. ही योजना राबविण्या मागील सरकारचा उद्देश सशस्त्र दलात काम करणाऱ्या लोकांची संख्या कमी करून सैनिकांच्या पगारावरील भार कमी करण्याचा आहे. Agneepath scheme नुसार भारतीय रक्षा मंत्रालय दरवर्षी 4,6000 जवानांची नियुक्ती करेल.

या योजनेनुसार काही इतर प्रकारचे लाभ देखील या अस्थायी सैनिकांना दिले जातील. पण चौथ्या वर्षानंतर 75% अस्थाई जवानांना नोकरी संपवून त्यांना घरी पाठवण्यात येईल. ज्या जवानांना भारतीय सेनेमधून काढण्यात येईल, त्यांना चार वर्षांचा अवधी पूर्ण झाल्यानंतर 11.71 लाख रुपयांचे करमुक्त असलेले सेवानिधी पॅकेज देण्यात येईल. उर्वरित 25% जवानांना भारतीय सेनेमध्ये स्थायी नोकरी प्रदान केली जाईल.

अग्निवीर योजना भारत सरकारची एक महत्वकांक्षी योजना आहे. ज्याचा मुख्य उद्देश भारतीय सेनेतील नवीन स्थायी नोकरींवर आळा घालून पगारावर होणारा खर्च कमी करणे आहे. या योजनेच्या संबंधित असलेल्या अटी नव तरुणांना लक्षातआलेल्या आहेत आणि म्हणूनचं सगळीकडे या विरोधात प्रदर्शने होत आहेत. बिहार आणि उत्तर प्रदेश मध्ये ह्या आंदोलनाला हिंसक वळण लागलेले होते.

Key Highlights for Agneepath Yojana

 • योजने चे नाव: अग्निपथ योजना (अग्निवीर योजना)
 • कोणी लाँच केली: सूरक्षा मंत्रालय, भारत सरकार
 • केव्हा लाँच करण्यात आली: 14 जून 2022
 • योजने चे लाभार्थी: बेरोजगार तरुणवर्ग.

Eligibility Criteria for Agneepath Yojana in Marathi

Eligibility Criteria for Agneepath Yojana in Marathi
Eligibility Criteria for Agneepath Yojana in Marathi

अग्निपथ योजनेनुसार देशातील दहावी पास झालेले तरुण अग्नीवीर बनू शकतात. त्याचबरोबर या योजनेनुसार 17 वर्षे 6 महिन्यापासून ते 21 वर्षांपर्यंतचे तरुण या भरती प्रक्रियेसाठी पात्र मानले जातील.

Benefits of Agneepath Yojana in Marathi

 • या योजनेनुसार देशातील तरुण मुलांना भारतीय सेनेमध्ये ४ वर्ष सैनिक म्हणून काम करण्याची संधी मिळेल. स्थायी सैनिकांप्रमाणेच अग्निवीर सैनिकांना देखील पदक आणि मानसन्मान दिला जाईल.
 • ज्या अग्निवीर सैनिकांना चार वर्षानंतर सेनेतून काढण्यात येईल अशांना, शेवटी 11.71 लाख रुपयांचे TaxFree सेवानिवृत्ती पॅकेज देण्यात येईल.
 • या योजनेनुसार भरती झालेल्या सर्व जवानांना पहिल्या वर्षी 30 हजार रुपये मासिक वेतन दिले जाईल जे चौथ्या वर्षापर्यंत वाढवून 40 हजार रुपये मासिक एवढे होईल.
 • सेनेमध्ये ४ वर्षे काम केल्यानंतर देखील तुम्ही, बाहेरून बारावीची परीक्षा देऊन बारावी उत्तीर्ण होऊ शकता.
 • 21 वर्षांचे तरुण फक्त४  वर्षे सेनेमध्ये काम करून माजी सैनिक असल्यामुळे सगळीकडे गौरव प्राप्त करतील.
 • ह्या योजनेनुसार उर्वरित 25 % जवानांना भारतीय सेनेमध्ये स्थायी नोकरी मिळेल.
 • ही एक अस्थायी प्रकारची शॉर्ट टर्म नोकरी आहे यानंतर, हे तरुण शेती, व्यवसाय किव्हा नोकरी करू शकतात.
 • 25% अग्नीवीर जनसेनेमध्ये स्थायी नोकरी मिळेल अशांना पुढील १५ वर्ष सेनेमध्ये काम करता येईल.
 • या योजनेंतर्गत भरती झालेल्या जवानांना देशाची सुरक्षा व्यवस्था राखण्यासाठी नेहमी आघाडीवर ठेवण्यात येईल.
 • या योजनेनुसार वायुसेना त्याचबरोबर नौसेनेमध्ये स्त्रियांना प्राथमिकता देण्यात येईल.
 • सैनिक झाल्यानंतर तरुणांना उद्योजक बनण्याची इच्छा असल्यास त्यांना आर्थिक पॅकेज, बँक कर्ज आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील.
 • ज्यांना पुढे नोकरी करायची आहे त्यांना केंद्रीय सुरक्षा दलात राज्य पोलिसात प्राधान्य मिळेल.

Agneepath Yojana मुख्य उद्देश 

Agneepath योजनेचा मुख्य उद्देश तिन्ही सेनादलातील वेतन, आणि पेन्शनचा खर्च कमी करणे आहे. ज्याच्यामध्ये दिवसेंदिवस तीव्र वाढ होत आहे. वर्ष 2022 – 23 मध्ये भारतीय सरकारने सुरक्षा बजेट 5,25,166 करोड रुपये सांगितले आहे, ज्यामध्ये माजी सैनिकांना देण्यात येणाऱ्या पेन्शनचा हिस्सा 1,19,696 करोड रुपये आहे.

या सर्व गोष्टी लक्षात घेऊन केंद्रातील मोदी सरकार सशस्त्र दलांमध्ये कंत्राटी भरतीसारख्या संस्कृतीला चालना देण्याचा महत्त्वाकांक्षी प्रयत्न करत आहे. त्याचबरोबर हे सरकार देशातील नवतरुणांना अपील करत आहे की ह्या योजनेला समजून घेऊन, हिंसेचा रस्ता सोडून ही अस्थायी नोकरी देशहितासाठी आहे. यामध्ये सरकारला सहाय्य करावे.

अग्निपथ योजने चे नुकसान (जाणून घ्या विरोधाचे कारण)

 • या योजनेनुसार भरती झालेले तरुण फक्त ४ वर्षांमध्ये माजी सैनिक म्हणून ओळखले जातील. यानुसार जर त्यांना पुढे नोकरी मिळाली नाही तर त्यांचे भविष्य धोक्यात येऊ शकते.
 • अग्निवीर योजनेनुसार पेन्शन व ग्रेच्युटी दिली जाणार नाही.
 • 75% अग्निवीरांना चार वर्षानंतर सेनेमधून काढण्यात येईल.
 • काढून टाकण्यात आलेल्या या सैनिकांना सैनिक दल त्याचबरोबर राज्य पोलीस दलामध्ये नोकरीची कोणतीही गॅरेंटी नसेल. कारण या दलामध्ये आधीपासूनच रिक्त पदांची संख्या कमी असून नवीन भरती केली जात नाही आहे.
 • या माजी सैनिकांना यानंतर प्रायव्हेट जॉब करून पुढील जीवन व्यतीत करावे लागेल.
 • बऱ्याच तरुणांना चार वर्षानंतर शेती करण्याशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही.
 • बऱ्याच तरुणांचे असे म्हणणे आहे की अग्नीविरांचे भविष्य धोक्यात आहे. अग्नीपथ योजनेमुळे तरुणांना भारतीय सेनेत स्थायी नोकरींच्या संधी कमी होतील.
 • अग्निपथ योजनेंतर्गत सैनिक बनून निवृत्त झाल्यानंतर, पोलीस आणि निमलष्करी दलात नोकरी मिळवू इच्छिणाऱ्या, पण पुढे सैनिक बनण्याची इच्छा नसलेल्या अशा तरुणांसाठी ४ वर्षानंतर अडचणीचे ठरणार आहे.
 • त्याचबरोबर ही योजनेमूळे देशातील सशस्त्र दलाची क्षमता आणि देश भक्ती कमी होऊ शकते.

Agniveer Yojana age limit किती आहे ?

देशामध्ये होणाऱ्या विरोध प्रदर्शनांना लक्षात घेऊन, भारतीय सरकारने अग्निपथ योजने साठी Age Limit मध्ये बदल केले आहेत. हा निर्णय कोरोना महामारीमुळे घेण्यात आलेला आहे, मागील 2 वर्षांपासून जे तरुण भारतीय सेनेमध्ये दाखल होण्यासाठी प्रयत्न करत आहेत, त्यांच्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे. या योजनेमुळे असे तरुण Over Age घोषित केले गेले होते. आणि या विरोधात जेव्हा देशभरामध्ये आंदोलनाला सुरुवात झाली, त्यावेळेस ही गोष्ट लक्षात घेऊन भारतीय सरकारने या वर्षासाठी एज लिमिट 23 वर्ष इतके केले आहे. हा नियम फक्त या वर्षासाठी लागू आहे.

FAQ – Agnipath Scheme च्या संबंधित नेहमी विचारले जाणारे प्रश्न?

Q. नवीन अग्निवीर वयोमर्यादेत नवीन सुधारणा काय आहे?

A. वर्ष 2022-23 साठी, अग्निवीरांची उच्च वयोमर्यादा 21 वर्षांवरून 23 वर्षे करण्यात आली आहे.

Q. अग्निवीर भरतीमुळे तरुण वर्ग क्रोधित का आहे ?

A. लष्करात कायमस्वरूपी नोकरी, चांगला पगार, पेन्शन न मिळण्याचे स्वप्न भंगल्याने तरुणांच्या मनात संतापाचे वातावरण पसरले आहे. त्यामुळेच तरुणवर्ग मोठ्या प्रमाणात सरकारच्या अग्निपथ योजनेला विरोध करत आहेत.

Q. Who Can Apply for Agneepath Yojana?

A. अग्निपथ योजना ही एक करारावर आधारित तात्पुरती नोकरी आहे. या योजनेंतर्गत भरती झालेल्या २५ टक्के सैनिकांना केवळ ४ वर्षांसाठी सैन्यात काम करण्याची संधी मिळणार आहे. या योजनेंतर्गत 10 वी उत्तीर्ण झालेल्या तरुणांना तात्पुरत्या नोकऱ्यांसाठी पात्र मानले जाईल.

Q. या योजनेअंतर्गत नौदल आणि हवाई दलात तात्पुरती नोकरी मिळणे शक्य होईल का?

A. होय, लष्कराव्यतिरिक्त नौदल आणि हवाई दलात 4 वर्षांची तात्पुरती नोकरीही या योजनेअंतर्गत उपलब्ध होणार आहे.

Q. Agneepath Scheme Pdf Details कोठून Download करावी?

A. Agneepath Scheme Pdf Details तुम्हाला भारत सरकारच्या सुरक्षा विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर मिळेल.

तर मित्रांनो आजच्या या आर्टिकल मध्ये आपण Agneepath Yojana Kay ahe? अग्निपथ योजनेचा विरोध कशासाठी? अग्निपथ योजनेचे नुकसान? इत्यादी गोष्टी जाणून घेतल्या आहेत. आम्ही आशा करतो की हा लेख आपल्याला देखील आवडला असेल.

धन्यवाद.

हे देखील वाचा

Shravan Bal Yojana Mahiti

नेटवर्क मार्केटिंग म्हणजे काय?

 

नमस्कार मित्रांनो marathiyojana.com या वेबसाईट वर तुमचे स्वागत आहे. मित्रांनो आज काल सर्व गोष्टी ऑनलाईन झाल्या आहेत, म्हणजे बघा आज काल आपण घर बसल्याच आपल्याला मोबईल च्या साहाय्याने सर्व महत्वाची माहिती मिळून जाते. आपले भारतीय सरकारआपल्या सर्वांसाठी नवनवीन योजना आणत असतो. आणि त्या योजनांचा आपल्याला कसा फायदा करता येईल किव्हा त्या योजनांसाठी नोंदणी कशी करायची या संदर्भात सर्व माहिती तुम्हाला आमच्या या मराठी योजना वेबसाईट वर मळून जाईल.

Leave a Comment