Google Search console म्हणजे काय? । Information about Google Search console in Marathi

Google search console किंवा google webmaster tools हे काय आहे आणि ते कसे काम करते? आजच्या या टॉपिक मध्ये आपण याबद्दलच माहिती जाणून घेणार आहोत. सोबत कोण कोणते features तुम्हाला Google search console मध्ये मिळतात हे देखील जाणून घेऊयात?

What is the Google search console in Marathi?

Google search console ला google webmaster tool म्हणून देखील संबोधले जाते. हे गुगल द्वारे बनवले गेलेले एक टूल आहे ज्याच्या मदतीने आपण, आपल्या वेबसाईटच्या sitemap ला Google search engine मध्ये submit करू शकतो. Google search console tool आपल्या वेबसाईटवर traffic वाढवण्यासाठी मदत करतो.

Google search console मध्ये आपल्याला असे बरेचसे features मिळतात, ज्याचा वापर करून आपण आपल्या वेबसाईटची रँकिंग वाढवू शकतो. त्याचबरोबर वेबसाईट मध्ये येणाऱ्या errors ला शोधून त्यावर solution काढू शकतो. अजूनही बरेचसे फीचर्स तुम्हाला Google search console मध्ये मिळतात. जसे की – overview, performance, URL inspection, URL removals etc.

Google search console मध्ये आपल्या website ला add कसे करावे? 

Google search console मध्ये आपल्या website ला add कसे करावे 
Google search console मध्ये आपल्या website ला add कसे करावे
  • सर्वप्रथम आपल्या Google email ID द्वारे Google search console मध्ये लॉगिन करा.
  • आता add property वर क्लिक करा.
  • इथे तुम्हाला तुमच्या वेबसाईटचे URL द्यायचे आहे आणि continue वर क्लिक करायचे आहे.
  • आता तुम्हाला तुमच्या वेबसाईटला Verify domain ownership via DNS record करण्यासाठी सांगितले जाईल. यासाठी तुम्हाला काही txt record दिले जाईल, त्याला तुम्हाला तुमच्या डोमेनच्या DNS मध्ये टाकायचे आहे आणि नंतर verify वरती क्लिक करायचे आहे.
  • आता तुमचा domain Google search console मध्ये verify झाला आहे. आता तुम्हाला तुमच्या वेबसाईटचा साईट मॅप, Google Webmaster tool मध्ये submit करायचा आहे.

Google search console मध्ये आपल्या website चा sitemap कसा submit करावा?

Google search console मध्ये आपल्या website चा sitemap कसा submit करावा
Google search console मध्ये आपल्या website चा sitemap कसा submit करावा
  • सर्वप्रथम तुम्हाला Google search console मध्ये लॉगिन करायचे आहे.
  • इथे तुम्हाला लेफ्ट साईडला इंडेक्स चा ऑप्शन दिसेल.
  • याखाली तुम्हाला दुसऱ्या नंबर वर साईट मॅप चा ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करा.
  • आता तुम्हाला add a new sitemap लिहिलेले दिसून येईल , त्याखाली तुमच्या वेबसाईटच्या साईट मॅप चे URL पेस्ट करा आणि सबमिट वरती क्लिक करा.
  • आता तुमची वेबसाईट Google search console मध्ये submit झालेली आहे.

Features of Google search console in Marathi

Overview

Google search console मध्ये तुम्हाला overview चा ऑप्शन दिसेल, यामध्ये तुम्हाला तुमच्या वेबसाईटची performance report दिसेल म्हणजेच, तुमच्या वेबसाईटवर किती Impressions आणि किती क्लिक आलेले आहेत. गुगलने तुमच्या किती पेजेसला crawl केलेले आहे, हे देखील समजेल.

Performance

Performance च्या option मध्ये आपल्याला कळते की आपल्या वेबसाईटवर टोटल किती क्लिक आलेले आहेत आणि किती total Impressions आलेले आहेत. त्याचबरोबर Google search engine मध्ये आपल्याला average CTR काय मिळत आहे हे देखील कळते.

आता तुम्ही performance पेज च्या थोडे खाली स्क्रोल केले तर तुम्हाला इथे बरेच ऑप्शन दिसतील, जे पुढीलप्रमाणे आहेत.

  • Queries: इथे तुम्हाला समजेल की तुमच्या वेबसाईटच्या कोणत्या keyword वर Google search engine द्वारे किती Impressions आणि किती clicks मिळाले आहेत.
  • Pages: इथे तुम्हाला समजेल की तुमच्या कोणत्या पोस्टवर आणि कोणत्या पेजवर Google search engine कडून किती क्लिक मिळाले आहेत.
  • Countries: तुमच्या वेबसाईटवर कोणकोणत्या कंट्री मधून किती क्लिक आले आहेत हे तुम्हाला या ऑप्शनमध्ये बघायला मिळेल.
  • Devices: या ऑप्शनने तुम्ही बघू शकता की तुमच्या वेबसाईटवर कोणत्या डिवाइस ने किती क्लिक आले आहेत जसे की मोबाईल, लॅपटॉप किंवा डेक्सटॉप.

URL Inspection

या ऑप्शनने तुम्हाला कळेल की तुमचे पोस्ट google मध्ये इंडेक्स झाले आहेत की नाही. चला तर मग पाहूयात, तुमची पोस्ट गुगलवर इंडेक्स झालेली आहे की नाही हे कसे शोधावे.

सर्वात आधी तुम्हाला google search console च्या dashboard मध्ये जायचे आहे आणि यानंतर लेफ्ट साईडला तुम्हाला URL inspection चा ऑप्शन मिळेल त्यावर क्लिक करायचे आहे. आता तुम्हाला एक सर्च बार दिसेल ज्यामध्ये, तुम्हाला ज्या url ची टेस्ट करायची आहे ते कॉपी-पेस्ट करा.

URL inspection in google search console आता तुम्हाला done वरती क्लिक करायचे आहे, आता इथे तुम्हाला शो होईल की तुमची पोस्ट google मध्ये इंडेक्स झाली आहे की नाही.

URL inspection in google search console
URL inspection in google search console

जर तुमची पोस्ट इंडेक्स झालेली असेल तर URL is on Google लिहिलेले दिसून येईल. आणि जर तुमची पोस्ट इंडेक्स झालेली नसेल तर URL is not on Google असे लिहून येईल.

Website च्या post ला google वर index करण्यासाठी request कशी पाठवावी ?

  • इथे तुम्हाला URL inspection वाली process पुन्हा एकदा करायची आहे, वरील प्रोसेस केल्यानंतर राईट साईडला वरती test live URL चे बटन दिसेल, त्यावर क्लिक करा.
  • इथे Google search console तुमच्या URL ला live test करेल.
  • लाईव्ह टेस्ट केल्यानंतर जर तुम्हाला, URL is available to Google चा मेसेज दिसत असेल, पण तरीसुद्धा तुमची पोस्ट गुगलमध्ये इंडेक्स झालेली नसेल, तर तुम्ही तुमच्या पोस्टला google वरती इंडेक्स करण्यासाठी रिक्वेस्ट करू शकता.
  • गुगलमध्ये post index ची request पाठवण्यासाठी, राइट साईडला वरती दोन बटन दिलेले आहेत, Google index and live test.
  • आता तुम्हाला Google index वर क्लिक करायचे आहे आणि request indexing चा ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा.
  • आता तुमची रिक्वेस्ट submit झालेली आहे, आता तुमची पोस्ट काही तासातच google वर इंडेक्स होईल.

Sitemaps

इथे तुम्हाला तुमच्या वेबसाईचे sitemap submit करण्याचा ऑप्शन मिळतो, ज्यामुळे Google search console तुमच्या वेबसाईटच्या पेजेस किंवा पोस्टला crawl करतो.

WordPress website मध्ये sitemap कसे create करावे?

WordPress website मध्ये तुम्ही plugin च्या मदतीने sitemap create करू शकता, तुम्हाला फक्त एक plugin इन्स्टॉल करायचा आहे. Yoast SEO plugin आणि Rank math plugin हे plugin तुमच्या वेबसाईटचे sitemap स्वतः create करेल.

Removals : urls from google search engine

जर तुम्हाला गुगलवर index झालेल्या आपल्या वेबसाईटच्या कोणत्या url ला Google search engine मधून हटवायचे असेल तर तुम्ही या ऑप्शनचा युज करू शकता. इथून तुम्ही तुमच्या वेबसाईटवरील outdated content देखील हटवू शकता.

Mobile Usability

आजच्या काळामध्ये सर्वात जास्त browsing साठी मोबाईलचा वापर केला जातो. तुमच्या वेबसाईटवर येणारे 70 टक्के लोक , हे मोबाईल वरून येत असतात, यासाठी गुगल तुम्हाला या ऑप्शन मध्ये सांगते की तुमच्या वेबसाईटचे किती पेजेस mobile friendly आहेत.

Breadcrumbs

या ऑप्शनमध्ये तुम्हाला breadcrumbs बद्दल माहिती दिली जाते, की तुमच्या वेबसाईटवर किती breadcrumbs valid आहेत. जर कोणत्या breadcrumbs मध्ये कोणता error असेल तर तो सुद्धा या ऑप्शनमध्ये शो केला जातो.

Manual actions

जर तुमच्या वेबसाईटला penalized केलेले असेल तर तुम्हाला ते या टॅब मध्ये शो केले जाते. हे तेव्हा show केले जाते जेव्हा तुमची वेबसाईट कोणत्या illegal activity किंवा spamming मध्ये सामील असते.

Security issues

जर तुमचे वेबसाईटवर कोणत्याही प्रकारचा security issues आला तर तो या टॅब मध्ये show केला जातो.

Security Issue
Security Issue

International Targeting

या ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर तुमच्याकडे एक new tab ओपन होईल आणि यामध्ये तुम्हाला दोन ऑप्शन show केले जातील.

१. Language: या ऑप्शनमध्ये तुम्ही तुमच्या वेबसाईटच्या भाषेला सिलेक्ट करू शकता. आणि गुगल सर्च इंजिन ला सांगू शकता की तुमची वेबसाईट कोणत्या लँग्वेज मध्ये आहे.

२. Country: या टॅब मध्ये तुम्ही त्या country ला select करू शकता जिथे तुमच्या वेबसाईटला सर्वात जास्त टार्गेट करायचे आहे. जर तुमची वेबसाईट हिंदी मध्ये असेल तर तुम्ही India select करा. जर तुम्ही एखाद्या अशा विषयावर ब्लॉग बनवला असेल जो अमेरिका देशासंबंधी आहे तर तुम्ही या ठिकाणी कंट्री USA सिलेक्ट करा.

Benefits of  Google search console in Marathi

  1. आपल्या वेबसाईटवर ट्रॅफिक वाढते
  2. तुम्ही तुमच्या वेबसाईटच्या performance ला चांगल्या प्रकारे analysis करू शकता.
  3. तुमच्या वेबसाईटवर येणाऱ्या backlinks चेक करू शकता.
  4. Google Webmaster tool च्या मदतीने तुम्ही तुमच्या वेबसाईटला मोबाईल फ्रेंडली बनवू शकता.
  5. आपल्या वेबसाईटच्या urls मध्ये कोणत्याही error ला समजू शकता.
  6. जर तुमची वेबसाईट penalized झाली असेल तर याची देखील माहिती तुम्हाला गुगल सर्च कन्सोलमध्ये मिळते.

Conclusion

गुगल सर्च कन्सोलचा उपयोग आपल्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण ठरू शकतो. कारण इथे आपण वेबसाईटमध्ये वारंवार केल्या जाणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टी सुधारू शकतो. ज्यामुळे तुमची वेबसाईट गुगलमध्ये रँक करू शकते. गुगल सर्च कन्सोलच्या प्रत्येक टॅब ला तुम्हाला वेळोवेळी चेक करत राहायचे आहे, कारण त्यात येणाऱ्या error ला तुम्ही वेळेवर सॉल्व्ह करू शकता.

मित्रांनो आम्ही आशा करतो की वरील आर्टिकल तुम्हाला नक्की आवडला असेल.

धन्यवाद.

हे देखील वाचा

What is IP Camera in Marathi

नमस्कार मित्रांनो marathiyojana.com या वेबसाईट वर तुमचे स्वागत आहे. मित्रांनो आज काल सर्व गोष्टी ऑनलाईन झाल्या आहेत, म्हणजे बघा आज काल आपण घर बसल्याच आपल्याला मोबईल च्या साहाय्याने सर्व महत्वाची माहिती मिळून जाते. आपले भारतीय सरकारआपल्या सर्वांसाठी नवनवीन योजना आणत असतो. आणि त्या योजनांचा आपल्याला कसा फायदा करता येईल किव्हा त्या योजनांसाठी नोंदणी कशी करायची या संदर्भात सर्व माहिती तुम्हाला आमच्या या मराठी योजना वेबसाईट वर मळून जाईल.

Leave a Comment