IP Camera म्हणजे काय? । What is IP Camera in Marathi

आजच्या काळात security साठी cameras चा उपयोग केला जातो. आजच्या काळात दुकानात, Road वर, हॉस्पिटल्स, बँक, त्याचबरोबर स्कूल आणि colleges मध्ये सुद्धा cameras चा वापर केला जातो.

कॅमेऱ्यांमुळे एखाद्या जागेची किव्हा एखाद्या दुकानाची सुरक्षा करणे सोपे होते चालले आहे आणि आजच्या आधुनिक जगामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कॅमेराज यायला लागले आहेत जसे की – Smartphone camera, DSLR camera, mirrorless camera, compact camera, analog camera, CCTV camera, web camera, Wi-Fi camera इत्यादी.

या मधल्या काही cameras ना तुम्ही कुठूनही ॲक्सेस करू शकता आणि camera ने live footage देखील बघू शकता.

जसे की आम्ही वरती तुम्हाला सांगितले की कॅमेरे बऱ्याच प्रकारचे असतात त्यातीलच एक म्हणजे IP CAMERA आहे आणि आजच्या या आर्टिकल मध्ये आम्ही तुम्हाला फक्त IP Camera बद्दल माहिती देणार आहोत.

या आर्टिकल मध्ये आम्ही तुम्हाला IP camera बद्दल संपूर्ण माहिती देणार आहोत. यामध्ये आम्ही तुम्हाला IP camera काय आहे? ह्याला Install कसे केले जाते, IP camera चा उपयोग काय आहे, IP camera चे फायदे आणि नुकसान याबद्दल माहिती देणार आहोत.

IP Camera म्हणजे काय? । What is IP Camera in Marathi

What is IP Camera in Marathi
What is IP Camera in Marathi

IP camera चा फुल्ल फॉर्म Internet protocol camera असा आहे. IP camera एक digital video camera असतो जो Control Data ला receive करतो आणि IP network च्या मदतीने Images data ला send करतो.

हा कॅमेरा प्रामुख्याने लक्ष ठेवण्यासाठी वापरला जातो. परंतु analogue closed circuit camera च्या विपरीत ह्या camera ला कोणत्याही local recording device ची गरज नसते. पण केवळ एक Local area network ची आवश्यकता असते ज्याला network video recorder म्हटले जाते.

Local area network किंवा NVR(network video recorder) च्या मदतीने camera footage ला अगदी सोप्या पद्धतीने रेकॉर्ड केले जाऊ शकते आणि नेहमीसाठी सुरक्षित ठेवले जाऊ शकते. IP Camera ला NVR सोबत आणि NVR शिवाय देखील वापरले जाऊ शकते. या आधुनिक कॅमेऱ्यामध्ये तुम्ही सिग्नल्स देखील पाठवू शकता आणि रिसिव्ह देखील करू शकता.

IP camera Internet शी connected असतो ज्यामुळे तुम्ही याची footage जगातल्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये बसून बघू शकता. या कॅमेऱ्याला तुम्ही तुमच्या smartphone tablet किंवा laptopसोबत connect करू शकता. आणि यानंतर तुम्ही त्यामध्ये या कॅमेराची Live footage कुठूनही बघू शकता.

या कॅमेरा मध्ये केबल नेटवर्क चा वापर केला जातो. ह्यामध्ये Internet च्या माध्यमातून केबल नेटवर्क ला broadband modem किंवा routerसोबत जोडले जाते. याशिवाय IP Camera चा उपयोग अजून आधुनिक प्रकारे केला जातो जसे की – या camera ला Wi-Fi router सोबत जोडले जाते.

सोप्या भाषेत सांगायचं झालं तर IP Camera हा तो कॅमेरा असतो जो internet सोबत connected असतो आणि तुम्ही हवे तेव्हा तुमच्या smartphone, tablet किंवा laptop मधून केव्हाही कुठेही Access करू शकता.

IP Camera ला Install कसे करावे? । How to install IP Camera in Marathi

How to install IP Camera in Marathi
RJ45 connectors

जर तुम्हाला RJ45 connectors बनवायला येते तर तुमच्यासाठी IP Camera install करणे खूपच सोपे आहे.

यासाठी सर्वप्रथम तुम्हाला cat6 LAN cable घ्यावी लागेल आणि त्याच्या दोन्ही end points मध्ये तुम्हाला RJ 45 connector ला connect करायचे आहे. जर तुमच्याकडे वेगळे POE switch नसेल तर तुमच्या कॅमेरासाठी वेगळी power cable टाकावी लागेल आणि यानंतर त्याला camera power supply ने power द्यावी लागेल.

जर तुम्हाला RJ 45 connector बनवायला येत नसेल तर तुम्ही मार्केट मधून I/O आणि patch code घेऊ शकता. I/O बनवणे सोपे असते कारण त्यामध्ये already colors दिलेले असतात, ज्यामध्ये तुम्हाला फक्त wires ला connect करावे लागते.

जर तुम्ही NVR आणि camera एकाच कंपनीचा घेतला असेल तर तुम्हाला जास्त काही करावे लागणार नाही. कारण हे cameras plug आणि play करण्यासाठी असतात. म्हणजे तुम्ही यांचा सरळ वापर करू शकता.

परंतु जर तुमचा camera plug and play चालत नसेल, तर तुम्हाला NVR मध्ये जायचे आहे आणि तिथे add camera वरती click करून त्या कॅमेराला add करायचे आहे यानंतर तुमचा कॅमेरा चालू होईल.

NVR शिवाय जर तुम्हाला एक पेक्षा अधिक IP Camera कंप्यूटर मध्ये चालवायचा असेल तर तुम्हाला एक राऊटर किंवा switch ची गरज लागते. असे तुम्हाला यासाठी करावे लागेल कारण generally कंप्यूटर मध्ये एकच LAN port असते, पण काही महागड्या कम्प्युटरमध्ये 2 LAN ports देखील असतात.

जर तुम्ही POE switch किंवा router चा वापर केला तर ते तुमच्यासाठी फायदेशीर असेल कारण असे केल्यानंतर तुम्हाला कोणत्याही power cable किंवा power supply ची गरज भासणार नाही.

IP Camera चा उपयोग काय आहे? । Use of IP Camera in Marathi

  • IP Camera चा वापर नजर ठेवण्यासाठी  केला जातो. यामुळे सुरक्षितता कायम राहते. जर तुम्ही कोणत्या कोणत्या दुकानाचे ओनर असाल आणि नेहमी दुकानाच्या बाहेर असता तर तुम्ही IP Camera आपल्या दुकानात लावू शकता आणि हवे तेव्हा ती footage तुमच्या कोणत्याही डिवाइस मध्ये बघू शकता.
  • असे केल्याने तुम्ही तुमचे कर्मचारी आणि ग्राहकांवर लक्ष ठेवू शकता. एवढेच नाही तर हा कॅमेरा live footage सोबतच सगळ्या फुटेजेस record देखील करतो ज्याला तुम्ही केव्हाही नंतर बघू शकता.
  • Recording चा फायदा हा असतो की जर तुमच्या दुकानांमध्ये चोरी किंवा काही गोष्ट घडली तर तुम्हाला काही दिवसानंतर ते समजते, तेव्हा तुम्ही camera footage बघून चोर शोधू शकता.
  • या कॅमेरा चा उपयोग तुम्ही कुठेही करू शकता जसे की- hospitals मध्ये, घरांमध्ये, स्कूल, कॉलेजेस मध्ये इत्यादी.
  • जर तुमचे दुकान मोठे असेल आणि ते तुम्हाला सुरक्षित ठेवायचे असेल तर तुम्ही नक्कीच या कॅमेऱ्याचा उपयोग करू शकता ज्यामुळे सुरक्षा वाढते.

IP Camera चे फायदे । Benefits of IP Camera in Marathi

1) Good Video Quality: IP camera 4K resolution एवढे support करतो, ज्यामुळे याची video quality खूप चांगली असते. यामध्ये तुम्ही कोणत्याही अन्य कॅमेऱ्या सारखे वेगवेगळे resolution चे कॅमेरे घेऊ शकता. तुम्ही जेवढे जास्त चांगल्या resolution चे कॅमेरे घ्याल तेवढी जास्त व्हिडिओ कॉलिटी तुम्हाला चांगली मिळेल.

2) Clean Installation: IP camera मध्ये cat6 cable चा वापर केला जातो ज्यामुळे याची installation खूपचसोपे असते

3) Intelligence: या कॅमेरा मध्ये तुम्हाला बरेच advance features मिळतात. जसे की आम्ही तुम्हाला सांगितले IP camera Internet सोबत जोडला गेलेला असतो ज्यामुळे तुम्ही त्याची फुटेज कुठूनही तुमच्या डिवाइस वर बघू शकता.

4) Easily Accessible: सगळ्यात मोठा फायदा हा आहे की यास तुम्ही कुठूनही ॲक्सेस करू शकता आणि याची फुटेज कुठूनही बघू शकता. पण यासाठी तुम्हाला NVR घ्यावा लागू शकतो.

IP Camera चे नुकसान । Disadvantages of IP Camera in Marathi

1) Costly: IP camera एक digital camera आहे आणि digital cameras analog cameras पेक्षा महाग असतात ज्यामुळे IP Camera महाग पडतो.

​2) Storage: IP cameras high resolution cameras असतात ज्यामुळे यांची video quality खूप चांगली असते आणि यामुळे ह्या व्हिडिओज च्या files ची size खूप मोठी असते ज्यामुळे या व्हिडिओ फाइल्स ला स्टोअर करण्यासाठी जास्त storage space ची गरज भासते.

3) Difficult to Use: IP cameras थोडेसे complicated असतात ज्यामुळे याचा वापर करणे सोपे नसते.काही IP cameras चे installation देखील खूप जास्त complex असते. पण जर तुम्हाला कंप्यूटर बद्दल थोडीफार माहिती असेल तर तुम्ही याचा नक्की वापर करू शकता.

IP Camera शी संबंधित काही प्रश्न । FAQ

Q. IP Camera चा Full Form काय आहे ?

A. IP camera चा full form Internet Protocol Camera असा आहे.

Q. IP Camera म्हणजे काय?

A. IP camera एक digital video camera असतो जो control data ला receive करतो आणि IP Network च्या मदतीने images data ला सेंड करतो.

निष्कर्ष । Conclusion 

जसे की आम्ही वरती तुम्हाला सांगितले जर तुमचे कोणते दुकान किंवा असे कोणते स्थान असेल जिथे तुम्हाला नेहमी लक्ष ठेवायचे असेल किंवा तुम्हाला सिक्युरिटीची गरज आहे तर तिथे तुम्ही IP Camera इन्स्टॉल करू शकता आणि हवे तेव्हा live footage तुमच्या डिवाइस वर बघू शकता.

मित्रांनो आम्ही आशा करतो की वरील आर्टिकल तुम्हाला नक्की आवडला असेल, IP camera संबंधित जर तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मार्फत आम्हाला नक्की विचारा.

धन्यवाद.

हे देखील वाचा

What is Encryption in Marathi

नमस्कार मित्रांनो marathiyojana.com या वेबसाईट वर तुमचे स्वागत आहे. मित्रांनो आज काल सर्व गोष्टी ऑनलाईन झाल्या आहेत, म्हणजे बघा आज काल आपण घर बसल्याच आपल्याला मोबईल च्या साहाय्याने सर्व महत्वाची माहिती मिळून जाते. आपले भारतीय सरकारआपल्या सर्वांसाठी नवनवीन योजना आणत असतो. आणि त्या योजनांचा आपल्याला कसा फायदा करता येईल किव्हा त्या योजनांसाठी नोंदणी कशी करायची या संदर्भात सर्व माहिती तुम्हाला आमच्या या मराठी योजना वेबसाईट वर मळून जाईल.

Leave a Comment