सोलो ट्रॅव्हल म्हणजे काय? । Solo Travelling Tips in Marathi

सोलो ट्रॅव्हल म्हणजे काय? । Solo Travelling Tips in Marathi

Solo Travelling Tips in Marathi: मित्रांनो आज आपण सोलो ट्रॅव्हल काय आहे हे जाणून घेऊया, अनेकांना प्रवास करायला आवडतो, पण असे काही भटके असतात ज्यांना एकट्याने प्रवास करण्याचा आनंद मिळतो, बघितले तर एकट्याने प्रवास करण्याचीही एक वेगळीच मजा असते.जे ऐकटे फिरायला जातात त्यांना सोलो ट्रॅव्हलर म्हणतात आणि या सोलो ट्रॅव्हलच्या प्रक्रियेला सोलो ट्रॅव्हलिंग म्हणतात, आता सोलो ट्रॅव्हल भारतातही खूप लोकप्रिय होत चालले आहे.

आज मी तुम्हाला एकट्याने प्रवास करण्याचे फायदे आणि तोटे सांगणार आहे, एकट्याने प्रवास करणे विशेषतः अशा लोकांसाठी फायद्याचे आहे जे स्वतःमध्ये व्यस्त आहेत, ज्यांना जगाची फारशी पर्वा नाही, जरी बहुतेक लोकांना एकट्याने प्रवास करणे आवडत नाही त्यांना कुणासोबत तरी जायचं असतं, कुणाला आपल्या मित्रांसोबत जायचं असतं, तर कुणाला आपल्या कुटुंबासोबत, पण या सगळ्याच्या पलीकडे काही हि लोक असतात जे शांतपणे एकटे फिरण्यात मजा घेतात.

सोलो ट्रॅव्हलिंगचे बरेच फायदे आहेत आणि काही तोटे आहेत, तुम्हाला हे सर्व मी पुढे सांगणारच आहोत, प्रथम काही सोलो ट्रॅव्हल टिप्स बद्दल बोलूया ज्या एकट्या प्रवास कारण्याऱ्याने लक्षात ठेवल्या पाहिजेत.

Solo Travelling Tips in Marathi

Solo traveling tips in Marathi

Solo traveling tips in Marathi
Solo traveling tips in Marathi

1. आपले डेस्टिनेशन बद्दल जाणून घ्या: जेव्हा तुम्ही सहलीला एकटे जाल, म्हणजे तुम्ही एकट्याने प्रवास करता तेव्हा सर्वप्रथम, तुम्ही जिथे जाणार आहात त्या ठिकाणाची संपूर्ण माहिती घ्या, जसे की तिथले हवामान, तिथली भाषा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी काय प्रसिद्ध आहे हे देखील शोधले पाहिजे.

तुम्हाला हवे असल्यास तुम्ही इंटरनेटच्या मदतीने ही सर्व माहिती मिळवू शकता किंवा तुमचे कोणी नातेवाईक किंवा मित्र तिथे गेले असतील तर तुम्ही त्यांची मदत घेऊ शकता, तुम्ही राहण्याची व्यवस्थाही करू शकता, तेही तुमच्या बजेटनुसार, तुमच्यासाठी चांगली ठिकाणे तुम्ही शोधू शकता. खूप ठिकाणी धर्मशाळा उपलब्ध असतात, तुम्ही तिथेही राहू शकता किंवा एखादे चांगले हॉटेल पाहिल्यानंतर तुम्ही ते कमी किमतीत आधीच बुक करू शकता, राहण्याची समस्या पुरुषांपेक्षा महिलांना जास्त असते कारण सर्व हॉटेल सुरक्षित नाहीत, त्यामुळे महिलांनी अत्यंत सावधगिरी बाळगली पाहिजे. महिलांनी राहण्याची व्यवस्था स्वतःच इंटरनेट वर reviews पाहून चांगल्या ठिकाणी करावी. तसे, एक संस्था आहे जी महिलांना राहण्यासाठी वसतिगृहे उपलब्ध करून देते, तिचे नाव आहे Youth Hostel, ते देखील सुरक्षित आहे, त्यांची वसतिगृहे भारतातील अनेक शहरांमध्ये बांधली आहेत, तुम्ही त्यांच्या वेबसाइट http://www.yhaindia.org/ वरती जाऊन माहिती मिळउ शकता आणि तुम्हाला माहिती मिळेल की हे वसतिगृह सोलो ट्रॅव्हलसाठी खूप लोकप्रिय आहे.

2. तुमच्या सुरक्षेकडे लक्ष द्या: या प्रवासात तुम्ही एकटे असाल म्हणजे सोलो ट्रॅव्हल किंवा एकटे प्रवास करत असाल तर तुम्हाला तुमच्या सुरक्षिततेकडे विशेष लक्ष द्यावे लागेल, समजा तुम्ही ट्रेनने जात असाल तर आता तुम्हाला पाणी आणायला जावे लागेल, तेव्हा तुम्ही तुमच्या बॅगला कुलूप लावा . तुम्ही एकटे असाल तर सावध राहा, घाईगडबडीत कोणत्याही अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवू नका.

3. स्थानिक लोकांची मदत घ्या: जर तुम्हाला कुठेही पोहोचण्यात किंवा काही शोधण्यात कोणतीही अडचण येत असेल तर तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या कोणत्याही दुकानदाराला किंवा इतर कोणत्याही स्थानिक व्यक्तीला काळजीपूर्वक विचारू शकता. जेव्हा तुम्ही बसून चहा प्याय तेव्हा बोलता बोलता सर्व माहिती तुम्हाला चहा विक्रेत्याकडून मिळू शकते.

4. स्वत:ची तयारी: एकट्या प्रवासात स्वत:ची तयारी देखील महत्त्वाची भूमिका बजावते, आता तुम्हीही स्वत:ची तयारी करा म्हणजे तुमची बॅग नीट बांधा, प्रवासाच्या ठिकाणानुसार कपडे ठेवा, काही रक्कम रोख आणि डेबिट कार्ड, आधार कार्ड किंवा आयडी प्रूफ, पाण्याची बाटली, हॉटेल बुकिंग पावतीची प्रिंट, तुमचा मोबाईल आणि त्याचा चार्जर, तुमच्या रिझर्व्हेशनची प्रिंट सुद्धा घायला विसरू नका, तुम्ही जिथे जात आहात तिथे जायचा यायचा दोन्हींचे आरक्षण करून घ्या. तसेच, किमान सामान घेण्याचा प्रयत्न करा, जर तुम्ही हे सर्व केले तर तुमचा सोलो प्रवास मजेदार होईल.

सोलो ट्रॅव्हल किंवा सिंगल ट्रॅव्हल किंवा एकट्याने प्रवास करण्याचे फायदे

1. सोलो ट्रॅव्हलचा सर्वात मोठा फायदा हा आहे की, आपण आपल्या इच्छेचे धनी असतो, आपल्याला पाहिजे ते आपण करू शकतो, आपल्याला जे हवे त्या हॉटेलमध्ये राहू शकतो, आपल्याला जे खायचे आहे ते आपण खाऊ शकतो. म्हणजे इन शॉर्ट आपल्याला कोणावर अवलंबून राहायला लागणार नाही किव्हा आपल्याला कोणाच्या मनासारखे करायची सुद्धा गरज नाही.

2. सिंगल ट्रॅव्हल किंवा सोलो ट्रॅव्हल मधून खूप काही शिकायला मिळतं, आता बघा कोणी मोठं सोबत असेल तर त्या मोठ्या माणसावरच आपण अवलंबून असतो, आपण कोणत्याही प्रवासाच्या कामात जास्त मन लावत नाही, पण जर कोणी सोबत नसेल तर प्रत्येक लहान लहान गोष्टी आपण ठरवायच्या असतात जसे की आपण जेवण कोठे खावे, आपण बसने जायचे की भाड्याने गाडीने जायचे, हा निर्णय देखील आपलाच असेल, त्याच प्रकारे आपल्याला आयुष्यात खूप काही शिकायला मिळते आणि आपण स्वावलंबी बनतो.

3. सोलो ट्रॅव्हलमध्ये नवीन मित्र बनतात, जसे समजा तुम्ही तुमच्या कुटुंबीयांसह किंवा मित्रांसोबत कुठेतरी गेलात, तर तुम्ही बहुतेक फक्त तुमच्या ग्रुपमधील सदस्यांशी बोलाल, पण तुम्ही एकटे असाल तर तुम्हाला तुमच्या आजूबाजूची परिस्थिती कळणार नाही त्या साठी तुम्हाला लोकांसोबत संवाद साधायला लागेल. आणि ते अनोळखी लोक कदाचित तुमचे मित्र देखील बनतील, यामुळे तुम्ही नवीन मित्र बनवाल आणि तुमची संभाषणाची कलाही सुधारेल.

4. सोलो ट्रॅव्हलमुळे पैशांचीही बचत होते, चला समजूया कसे. एकदा मी माझ्या काही मित्रांसोबत हरिद्वारला गेलो होतो तिथे राहायला, सगळ्यांना एक हॉटेल आवडले होते जे खूप महाग होते, पण माझ्या मनात होते कि आपण एका धर्मशाळेत राहूया कारण फक्त काही तास झोपण्यासाठी हजारो रुपये त्या महागड्या हॉटेल मध्ये मोजावे लागत होते. पण सोलो ट्रॅव्हलमध्ये असे काही नसते. आपण आपल्या मर्जीचे मालक असतो. तुम्हाला कोणत्याही बजेट हॉटेलमध्ये किंवा धर्मशाळेत राहायचे असेल तर तो फक्त आमचा निर्णय असेल.

5. मित्रांनो, आपण हवे तेव्हा हिंडू शकतो, हे उदाहरणाद्वारे समजून घेऊया, समजा तुम्ही साताऱ्याचे रहिवासी आहात, तुम्हाला तुमच्या कुटुंबीयांसह किंवा मित्रांसह पुणे जिल्ह्यात असलेल्या शनिवार वाड्याला भेट द्यायची आहे, परंतु तुमच्या ग्रुप मधील १-२ जण नाही बोलतात किव्हा १-२ जणांनी ते आधीच पहिले असते म्हणून त्या एक-दोन जणांमुले तुमचा प्लॅन उद्ध्वस्त होतो, आता समजा एकट्यानेच प्रवास करायचा असेल तर तुम्हाला इतर कोणाचीही पर्वा नाही, तुम्ही हवं तेव्हा, हवं तिथे एकट्याने प्रवास करू शकतो

6. या धावपळीच्या जीवनात आपण स्वत:साठी वेळ देऊ शकत नाही, एकट्याने प्रवास केल्याने आपल्याला अधिकाधिक वेळ स्वतःसोबत घालवण्याची आणि स्वतःला जाणून घेण्याची संधी मिळते.

7. एकट्याने प्रवास करताना किंवा सोलो ट्रॅव्हल करताना कोणत्याही प्रकारची अडचण आली तर ती तुम्हालाच सोडवावी लागते, त्यामुळे तुम्ही जबाबदार बनता, तुमच्या विचारांची व्याप्ती वाढते, तुम्ही तुमच्या कमकुवततेशी लढण्यास सक्षम बनता.

एकट्या प्रवासाचे तोटे | Disadvantages of Solo traveling in Marathi

Disadvantages of Solo traveling in Marathi
Disadvantages of Solo Traveling in Marathi

1. तसे सिंगल ट्रॅव्हल पाहिला, काही विशेष नुकसान नाही, फक्त एवढंच आहे की तुम्ही थोडं सावध राहा, जेव्हाही तुम्ही एकटे फिरायला जाल तेव्हा थोड्या वेळात तुमच्या घरच्यांशी बोलत राहा.अनोळखी लोकांमध्ये जास्त मिसळू नका, तुम्हाला तुमच्या सुरक्षिततेकडे पूर्ण लक्ष द्यावे लागेल कारण तुमच्यासोबत दुसरे कोणी नसते.

2. कधी कधी सोलो ट्रॅव्हलमध्ये काही गोष्टी महाग होतात, जसे की हॉटेलची खोली, समजा दोन बेडची खोली 4000 रुपयांना मिळते, आम्ही दोन लोक असलो तर दोघांसाठी फक्त 2000-2000 रुपये लागतात, पण जर तुम्ही एकटे असाल तर 4000 रुपये तुम्हाला एकट्याला द्यावे लागतील.

3. सोलो ट्रॅव्हलींग मध्ये जेवण पण महाग आहे, तुम्ही दोन लोक आहात, तुम्ही बटर चिकन ऑर्डर केले आणि दोघांनी वाटून घेतले आणि जे बिल आले ते देखील दोघांनी वाटून भरले, पण तुम्ही जात एकटे असाल तर तुम्हाला पूर्ण बिल भरावे लागेल .

4. सोलो ट्रॅव्हलमध्ये तुम्हाला सेल्फीनेच जास्त करून तुमचे ते क्षण capture करू शकता. कारण तुम्ही कोणालाहि फोटो क्लिक करण्यासाठी वारंवार सांगणार नाही किव्हा काही ठिकाणी कोणीच नसेल तुमचा फोटो काढण्यासाठी, तुमचा मोबाइल किंवा कॅमेरा सेल्फींनी भरलेला असेल.

5. तिकीट घेण्यासाठी किंवा वॉशरूममध्ये जाण्यासाठी तुम्हाला रांगेत उभे राहावे लागत असल्यास, तुमचे सामान पाहण्यासाठी कोणीही नसते.

Final Words

Solo Travelling Tips in Marathi या पोस्टमध्ये, तुम्हाला सोलो ट्रॅव्हल टिप्सबद्दल तपशीलवार माहिती दिली आहे, जरी सोलो ट्रॅव्हल काहींसाठी चांगला आहे, तर काहींसाठी सोलो ट्रॅव्हलिंग मध्ये वाईट अनुभव आलेला आहे; आता हा आपला स्वतःचा दृष्टिकोन आहे, या मध्ये जसे तोटे आहेत तसे फायदे देखील आहेत. जसे कि आता तुम्ही एकट्यानेच प्रवास करणार असल्याने तुम्हाला गाडीचा, हॉटेल चा खर्च जास्त लागू शकतो, पण तुम्ही शेअरिंग करून कुठेतरी गेलात तर तुमच्यासाठी स्वस्त पडेल, अशा प्रकारे प्रत्येकाचा दृष्टीकोन वेगळा असतो, सोलो ट्रॅव्हलबद्दल तुमचे काय मत आहे आहे खाली कंमेंट करून नक्की सांगा?

नमस्कार मित्रांनो marathiyojana.com या वेबसाईट वर तुमचे स्वागत आहे. मित्रांनो आज काल सर्व गोष्टी ऑनलाईन झाल्या आहेत, म्हणजे बघा आज काल आपण घर बसल्याच आपल्याला मोबईल च्या साहाय्याने सर्व महत्वाची माहिती मिळून जाते. आपले भारतीय सरकारआपल्या सर्वांसाठी नवनवीन योजना आणत असतो. आणि त्या योजनांचा आपल्याला कसा फायदा करता येईल किव्हा त्या योजनांसाठी नोंदणी कशी करायची या संदर्भात सर्व माहिती तुम्हाला आमच्या या मराठी योजना वेबसाईट वर मळून जाईल.

Leave a Comment