Maharashtra Atal Saur Krishi Pump Yojana – Marathi Yojana

Maharashtra Atal Saur Krishi Pump Yojana

नमस्कार शेतकरी मित्रांनो,

आपल्या महाराष्ट्र सरकारने आपल्याच राज्यातील शेतकऱ्यांना सिंचनाशी संबंधित सुलभ सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी “महाराष्ट्र सरकार मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना” नावाची योजना आखली आहे. या योजनेअंतर्गत सोलर पंप, त्याचबरोबर सोलार पंप लावण्यासाठी शेतकऱ्यांना सरकार तर्फे सबसिडी प्रदान करण्यात येणार आहे. या आधी शेतकरी सिंचनासाठी डिझेल पंप किंवा इलेक्ट्रॉनिक पंप चा वापर करायचे. यामुळे शेतकऱ्यांचा खर्च फार वाढायचा आणि शेतीसाठी लागणारी लागत कितीतरी पटीने वाढायची. पण आता या योजनेमुळे शेतकऱ्यांना या समस्येचे खूप चांगले समाधान मिळणार आहे आणि या सोलर पंपामुळे शेतकऱ्यांची मोठी आर्थिक बचत सुद्धा होणार आहे.

तुमच्या माहिती साठी सांगतो कि या योजनेचा शुभारंभ महाराष्ट्र सरकारने आज पासून तीन साल आधी २०२० साली केला होता. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सिंचनासाठी लागणारे सोलर पंप हे कमीत कमी किमतीत उपलब्ध करून दिले जातील त्याचबरोबर शेतकऱ्यांना सबसिडी देखील देण्यात येईल.

Saur Krishi Pump Scheme 2023 Details in Highlights in Marathi

  • योजनेचे नाव काय आहे: “महाराष्ट्र मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना”
  • हि योजना कोणी सुरु केली: महाराष्ट्र सरकार
  • योजनेचे लाभार्थी कोण: महाराष्ट्रातील शेतकरी वर्ग
  • योजनेचे उद्धेश: सर्व शेतकर्‍यांना सौर पंप प्रदान करणे
  • योजनेची अर्ज प्रक्रिया: ऑनलाइन
  • या योजनेची अधिकृत वेबसाइट: https://www.mahadiscom.in/

Maharashtra Atal Saur Krishi Pump Yojana: Objectives

या योजनेचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना जुन्या सिंचन यंत्रा व्यतिरिक्त नवीन सोलार पंप उपलब्ध करून, डिझेल आणि इलेक्ट्रॉनिक पंप वर होणारा खर्च वाचवणे हा आहे. त्याचबरोबर हे सोलार पंप कमी किमतीमध्ये शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे हे आपल्या महाराष्ट्र  सरकारचे मुख्य उद्दिष्ट असणार आहे.

Benefits of Maharashtra Atal Saur Krishi Pump Yojana

1) बघा शेतकरी मित्रांनो, या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना डिझेल किंवा इलेक्ट्रॉनिक पंपा व्यतिरिक्त सोलर पंप उपलब्ध करून दिले जातील.

2) शेतकऱ्यांना जे हे सोलार पंप उपलब्ध करून दिले जातील त्या बरोबरच सबसिडी(Subsidy) देखील प्रदान केली जाईल.

3) सर्वात मोठा फायदा असा आहे कि हा सोलर पंप खरेदी करण्यासाठी राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना पूर्ण पाने 95% सबसिडी प्रदान केली जाईल.

4) यामध्ये जे लाभार्थी  शेतकरीआहेत त्यांना केवळ 5% च रक्कम स्वतःला भरावी लागेल आणि बाकी पूर्ण रक्कम सरकार तर्फे Subsidy प्रदान केली जाईल.

5) जेव्हा शेतकरी डिझेल किंवा इलेक्ट्रॉनिक पंप व्यतिरिक्त सोलार पंप चा उपयोग करतील तेव्हा एकूणच त्यांच्या खर्चामध्ये घट होईल. जो खर्च डिझेल आणि वीजेमुळे येत होता, त्याची बचत होऊन शेतकऱ्यांना याचा फायदा होईल.

6) शेतकऱ्याच्या एकूण खर्चापैकी एक मोठी रक्कम डिझेल किंवा इलेक्ट्रॉनिक पंप वापरल्याने जात होती पण या सोलर पंपामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल व खर्च वाचेल.

7) नियमित सोलार पंपाच्या वापरामुळे पर्यावरणाला हानी आणि वायू प्रदूषण होणार नाही, कारण या आधी डिझेल आणि इलेक्ट्रॉनिक पंपामुळे बऱ्याच प्रमाणात प्रदूषण होत होते.

8) याशिवाय, सिंचना दरम्यान डिझेल आणि इलेक्ट्रिक पंप वापरण्यासाठी वापरल्या जाणार्‍या विजेचा खर्चही मोठ्या प्रमाणात कमी होऊन सरकारला याचा फायदा होणार आहे.

9) सिंचन विभागाकडून विजेसाठी जी सबसिडी दिली जाते, त्या सबसिडीचे ओझे देखील यामुळे कमी होईल.

महाराष्ट्र सरकार मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना चे लाभ मिळवण्यासाठी खालील दिशानिर्देश तयार करण्यात आलेले आहेत.

1) सर्वात प्रथम महत्वाची बाब म्हणजे या योजनेचा लाभ केवळ आणि केवळ फक्त महाराष्ट्र राज्याचे मूळ निवासी घेऊ शकतात.

2) केवळ शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ घेता येणार आहे इतर व्यवसाय करणारे लोक या योजनेसाठी पात्रनसणार आहेत.

3) या योजने अंतर्गत पहिल्या टप्प्यात महाराष्ट्र सरकार द्वारे शेतकऱ्यांना एकूण 25,000 सोलार पंप दिले जातील.

4) दुसऱ्या टप्प्यामध्ये 50,000 नामांकित शेतकऱ्यांना हे सोलर पंप दिले जातील.

5) ज्या शेतकऱ्यांकडे विजेचे कनेक्शन नाही, अशांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे त्याचबरोबर ज्यांच्याकडे पहिल्यापासूनच विजेचे कनेक्शन आहे अशांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.

6) दुर्गम आदिवासी भागात राहणारे शेतकरी या योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहेत.

7) वनविभागाकडून एनओसी मिळालेली गावे, ज्या ठिकाणी वीज जोडणी नाही अशा शेतकऱ्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे.

8) पाच एकर जमीन असलेल्या शेतकऱ्यांना 3HP किंवा पाच एकर हून अधिक जमीन असलेल्या शेतकऱ्यांना 5HP सोलर पंप देण्यात येतील.

9) जे शेतकरी सिंचनासाठी नदी, नाले, तलाव किंवा विहीर यावर निर्भर आहेत अशांना देखील या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

10) सौर कृषी पंप योजनेच्या लाभार्थींना तीन श्रेणींमध्ये वेग वेगळे केलेले आहे, या वर्गवारी नुसारच अनुदानाची रक्कम ठरवली जाईल.

11) सर्व श्रेणीतील शेतकर्‍यांसाठी, सर्व श्रेणीतील शेतकर्‍यांना 3HP किंवा 5HP सौर पंप बसवायचे असतील , तर त्यांना सौर पंपांच्या किमतीच्या 10% रक्कम भरावी लागेल; उर्वरित ९० टक्के रक्कम राज्य सरकार कडून देण्यात येईल.

12) मागासवर्गीय जातीतील शेतकऱ्यांसाठी, ज्या शेतकऱ्यांना आपल्या शेतामध्ये 3HP किंवा 5HP सोलर पंप लावायचे असतील अशांना सोलर पंपाच्या किमतीच्या 5% रक्कम भरावी लागेल, उर्वरित 95% रक्कम राज्य सरकार तर्फे भरण्यात येईल.

Maharashtra Atal Saur Krushi Pump Yojana: Required Documents

Maharashtra Atal Saur Krushi Pump Yojana Required Documents
Maharashtra Atal Saur Krushi Pump Yojana Required Documents

 

महाराष्ट्र सरकार मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 2022 साठी लागणारे आवश्यक कागदपत्रे

1) अर्जदाराचे आधार कार्ड.
2) मूळ ओळखपत्र.
3) शेतीची कागदपत्रे किंवा शेतीचे तपशील.
4) बँक खाते तपशील आणि पासबुक.
5) मोबाईल नंबर.
6) जात प्रमाणपत्र.
7) पासपोर्ट आकाराचा फोटो.

Registration Process Maharashtra Atal saur krushi pump Yojana

महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना नोंदणी प्रक्रिया

1) या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी अधिकृत वेबसाइट https://www.mahadiscom.in/solar/index.html ला भेट द्यावी.

2) यानंतर, “beneficiary services” या पर्यायावर क्लिक करताच अर्ज दिसण्यास सुरुवात होईल.

3) या अर्जामध्ये, “paid pending AG connection consumer details” (applicant details and location) , “जवळचा MSEDCL ग्राहक क्रमांक” (जिथे पंप बसवला जाणार आहे), अर्जदाराचे कायमचे निवासस्थान आणि सध्याचा पत्ता “अर्जदाराचा निवासी पत्ता तसेच स्थानाचा तपशील” भरावा लागेल.

4) त्यानंतर आवश्यक कागदपत्रे या आपल्या सरकारच्या अधिकृत वेबसाईट वर अपलोड करावी लागतील.

5) सर्व माहिती भरल्यानंतर, तुम्ही “सबमिट” बटन वर क्लिक करताच अर्ज सबमिट केला जाईल. अशा प्रकारे अर्जाची प्रक्रिया पूर्ण होईल.

6)अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यावर, एक लाभार्थी आयडी तयार केला जाईल, हा आयडी अर्जाची स्थिती तपासण्यासाठी वापरला जातो.

अर्जाचे स्टेटस चेक करण्यासाठी काय करावे?

प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, जर लाभार्थ्याला त्याच्या/तिच्या अर्जाचे स्टेटस चेक करायचे असेल, तर त्याने खालील steps चे पालन करावे.

1) ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन बेनिफिशियरी सर्विसेस या ऑप्शन वरती क्लिक न करता आता तुम्हाला “track application status” ह्या option वर क्लिक करायचे आहे.

2) या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर एप्लीकेशन स्टेटस बघण्यासाठी बेनिफिशरी आयडी टाकून सर्च या बटणावर क्लिक करा.

3) सर्च केल्यानंतर तुम्हाला तुमचे एप्लीकेशन स्टेटस दिसेल.

Final Words 

मित्रांनो महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना सोलार पंप उपलब्ध करून देणे हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. यामुळे सिंचनासाठी डिझेल अथवा विजेवरती होणारा खर्च कमी होण्यास शेतकऱ्यांना मदत होणार आहे. शेतीसाठी लागणाऱ्या एकूण खर्चात यामुळे बचत होणार आहे. शेतकऱ्यांचे पैसे तर वाचतीलच पण सोलर पंप मुळे सिंचन उत्तम प्रकारे करता येईल. त्यामुळे हि एक सर्वात महत्वाची योजना आपल्या महाराष्ट्र सरकारने आपल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी आणली आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

तर मित्रांनो आजचा हा लेख आपल्याला कसा वाटला हे कॉमेंट बॉक्स मार्फत आम्हाला नक्की कळवा. तुमच्या काही शंका असतील Saur Krishi Pump Scheme 2023 संबंधी तरी देखील खाली कंमेंट करून नक्की सांगा.

हे देखील वाचा:

Shravan Bal Yojana Mahiti

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top