एन्क्रिप्शन काय आहे ? | What is Encryption in Marathi
What is Encryption in Marathi: इंटरनेट आणि कम्प्युटरच्या या क्षेत्रामध्ये तुम्ही एनक्रीप्शन(encryption) हे नाव कधी ना कधी नक्की ऐकले असेलच. पण तुम्हाला माहिती आहे का की एनक्रीप्शन म्हणजे नक्की काय आहे? (What is encryption in Marathi) आणि हे कसे काम करते? जर तुम्हाला Encryption बद्दल संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्ही अगदी बरोबर आर्टिकल वाचत आहात. या लेखात तुम्हाला encryption सोबत decryption संबंधी देखील माहिती मिळून जाईल त्यामुळे हा लेख पूर्ण वाचा.
Encryption वास्तव मध्ये सायबर सुरक्षा सोबत जोडले गेलेले एक टेक्निकल टर्म आहे ज्याचा उपयोग आपला डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी केला जातो. आजच्या या तंत्रज्ञान युगात एनक्रीप्शन चा उपयोग कम्प्युटर क्षेत्रामध्ये खूप जास्त प्रमाणात केला जातो, कारण Encryption एक खूप सुरक्षित आणि मजबूत सिक्युरिटी टेक्निक आहे.
मित्रांनो सध्याच्या काळात, जवळपास सर्वच क्षेत्रामध्ये इंटरनेटचा वापर केला जातो, बँकिंग क्षेत्र असो किंवा मग सरकारी काम सर्व ठिकाणी आजच्या काळात इंटरनेट आणि कम्प्युटरचा उपयोग केला जातो, परंतु इंटरनेटवर डेटा चोरी होण्याची किंवा हॅक होण्याची नेहमी संभावना असते, यासाठीच डेटा ला एनक्रीप्शन टेक्निकने Encrypt केले जाते.
एनक्रीप्शन टेकनिकने डेटा सुरक्षित ठेवला जातो. ही एक खूप सुरक्षित टेक्निक आहे ज्याने डेटाला अटॅकर्स आणि चोरी होण्यापासून वाचवले जाते तर चला तर मग पाहूयात एन्क्रिप्शन म्हणजे काय? आणि Encryption कसे काम करते.
एन्क्रिप्शन काय आहे | What is Encryption in Marathi
एनक्रीप्शन एक एन्कोडींग ची प्रक्रिया असते ज्यामध्ये, डेटा ला एका विशेष कोड मध्ये बदलले जाते, ज्यामुळे त्या डेटा ला कोणीही वाचू किंवा समजू शकत नाही. एनक्रिप्शन टेक्निक मध्ये मूळ डेटा ला प्लेन टेक्स्ट (plain text) असे संबोधले जाते, आणि जेंव्हा त्यास परिवर्तित केले जाते तेव्हा त्यास सायफेर टेक्स्ट (Cipher Text) असे संबोधले जाते.
सोप्या शब्दात सांगायचं झालं तर डेटा ला प्लेन टेक्स्ट मधून परिवर्तित करून त्यास Cipher टेक्स्ट मध्ये कन्व्हर्ट करण्याच्या प्रक्रियेला एनक्रीप्शन संबोधले जाते.
एनक्रिप्शन टेकनिकचा उपयोग करून डेटा ला अनधिकृत व्यक्तींपासून वाचवण्यासाठी केला जातो, ज्यामध्ये डेटा ला unreadable format मध्ये बदलला जातो. Unreadable format म्हणजे मूळ डेटा ला या प्रकारे बदलले जाते ज्यास कोणीही समजू शकणार नाही.
एन्क्रिप्ट केलेला डेटा फक्त तोच व्यक्ती समजू करू शकतो ज्याकडे, तो एन्क्रिपेड डेटा access करण्यासाठी पासवर्ड किंवा decryption key आहे. म्हणजे encrypted data फक्त अधिकृत (authorized) व्यक्तीच access करू शकतो.
यास एका उदाहरणाने समजून घेऊ
असे समजा की तुम्हाला तुमच्या मित्राला, इंटरनेटवरून कोणता तरी पर्सनल मेसेज करायचा आहे, आणि तो मेसेज तुमच्या मित्रापर्यंत सुरक्षित प्रकारे पोहोचला पाहिजे असे तुम्हास वाटते, अन्य कोणी व्यक्ति त्या मेसेजला वाचू किंवा समजू शकणार नाही, तर तुम्ही त्या मेसेजला encryption key ने encrypt करू शकता आणि जेव्हा तो मेसेज तुमच्या मित्रापर्यंत पोहोचेल तेव्हा तुम्ही तुमच्या मित्राला decryption key द्याल व तो त्या decryption key ने तुम्ही पाठवलेला पर्सनल मेसेज decrypt करू शकतो.
Encryption Meaning In Marathi
मित्रांनो तुमच्या मनात देखील हा प्रश्न आला असेल की एन्क्रिप्शन चा मराठी अर्थ काय होतो. एनक्रीप्शन चा मराठी अर्थ म्हणजे कूट लेखन असा होतो. कूट लेखन म्हणजे कोणत्याही डेटाला अशाप्रकारे लिहिणे ज्यास कोणीही समजू किंवा वाचू शकणार नाही.
एनक्रीप्शनशी संबंधित काही महत्त्वपूर्ण शब्द
- Encrypt: कोणत्याही माहितीला अशा कोडमध्ये बदलणे जास्त अन्य कोणीही वाचू किंवा समजू शकणार नाही या प्रक्रियेला एन्क्रिप्ट संबोधले जाते.
- Decrypt: एन्क्रिप्ट करून ज्या माहितीला कोड मध्ये बदलले जाते आणि पुन्हा सामान्य रूपामध्ये परिवर्तित करण्याच्या प्रक्रियेला डीक्रिप्ट असे म्हटले जाते
- Plain Text: सामान्य माहिती ज्यास वाचू किंवा समजले जाऊ शकते त्याला plain text म्हटले जाते.
- Cipher Text: जेव्हा सामान्य माहितीला एन्क्रिप्ट करून कोड मध्ये कन्वर्ट केले जाते, तेव्हा त्या माहितीला Cipher text म्हटले जाते. हा एक असा Text असतो ज्याला कोणीही वाचू किंवा समजू शकणार नाही.
एन्क्रिप्शन चे प्रकार | Types Of Encryption in Marathi
एन्क्रिप्शन (Encryption) चे मुख्यतः दोन प्रकार असतात
- Symmetric Encryption
- Asymmetric Encryption
चला तर Symmetric Encryption आणि Asymmetric Encryption बद्दल विस्तारितपणे माहिती जाणून घेऊ .
- Symmetric Encryption: सिमेट्रिक एन्क्रिप्शन (Symmetric Encryption) हा एन्क्रिप्शन चा पहिला प्रकार आहे ज्यामध्ये डेटा एन्क्रिप्ट केल्यानंतर, डेटा पाठवणाऱ्या व्यक्तीला, encryption key डेटा रिसिव्ह करणाऱ्या व्यक्तीला शेअर करावी लागते, कारण symmetric encryption मध्ये डेटा ला एन्क्रिप्ट आणि डिक्रिप्ट करण्यासाठी एकाच key चा उपयोग केला जातो.
- Asymmetric Encryption: असिमेट्रिक एन्क्रिप्शन (Asymmetric Encryption) हा एन्क्रिप्शनचा दुसरा प्रकार आहे ज्यामध्ये डेटाला एन्क्रिप्ट आणि डिक्रिप्ट करण्यासाठी दोन वेगवेगळ्या keys चा वापर केला जातो, म्हणजे असेमेट्रिक एनक्रीप्शन मध्ये डेटा एनक्रीप्शन करण्यासाठी एक वेगळी key आणि डिक्रिप्शन करण्यासाठी एक वेगळी key असते. यासाठी असीमेट्रिक एनक्रिप्शनचा वापर जास्त करून पब्लिक नेटवर्क मध्ये डेटा शेअर करण्यासाठी केला जातो.
एन्क्रिप्शन चे फायदे | Advantages Of Encryption in Marathi
एन्क्रिप्शन चे अनेक फायदे आहेत जसे कि
- एनक्रीप्शन मुळे माहितीची सुरक्षा राखण्यासाठी मदत होते.
- एन्क्रिप्शन द्वारे डेटाची गोपनीयता आणि अखंडता राखण्यासाठी मदत होते.
- एन्क्रिप्शन टेक्निक कंप्यूटर / लॅपटॉप सोबतच इतर उपकरणांना सपोर्ट करते.
- Encryption मुळे डेटा ची authenticity कायम राहते.
- Encryption टेक्निक मुळे डेटा चोरी होण्याची संभावना कमी होते.
एन्क्रिप्शन चे महत्व | Importance of Encryption in Marathi
इंटरनेटच्या या जगामध्ये डेटा शेअर करण्यासाठी आणि वैयक्तिक माहिती किंवा बोलण्यासाठी लोक आज-काल इंटरनेटचा खूप जास्त वापर करतात. आजच्या काळामध्ये इंटरनेटच्या माध्यमातून खूप जास्त डेटा ट्रान्सफर केला जातो. आणि या डेटाला सुरक्षित ठेवणे देखील तेवढेच गरजेचे असते, कारण आजच्या या डिजिटल जगामध्ये सायबर अपराधी स्वतःच्या फायद्यासाठी किव्हा तुमच्या कडून घेतलेला डेटा विकून पैसे कमवण्यासाठी नेहमी लोकांची वैयक्तिक माहिती चोरण्याचा प्रयत्न करत असतात.
कंप्यूटर आणि इंटरनेटच्या माध्यमातून ट्रान्सफर केल्या जाणाऱ्या या डेटा ला सुरक्षित ठेवण्यासाठी encryption चा उपयोग केला जातो ज्यामध्ये माहितीला एन्क्रिप्ट केले जाते, ज्यास कोणताही unauthorized व्यक्ती माहिती ॲक्सेस करू शकत नाही.
Encryption In Marathi FAQ’s
Q. एन्क्रिप्शन काय आहे ?
A. एन्क्रिप्शन एक एन्कोडिंग ची प्रक्रिया असते ज्यामध्ये डेटाला विशेष कोड मध्ये बदलून टाकले जाते, ज्यामुळे त्या डेटा ला अन्य कोणी व्यक्ती वाचू किंवा समजू शकत नाही.
Q. एन्क्रिप्शन चे किती प्रकार आहेत?
A. एन्क्रिप्शन चे मुख्यतः दोन प्रकार आहेत :- १. Symmetric Encryption आणि २. Asymmetric Encryption
Q एन्क्रिप्शन चा वापर का केला जातो?
A. Encryption टेक्निक चा वापर डेटा ला अनधिकृत व्यक्तींपासून वाचवण्यासाठी केला जातो.
Q. एन्क्रिप्शन चे काय महत्व आहे?
A. डेटाची सुरक्षितता, गोपनीयता आणि अखंडता कायम ठेवण्यासाठी एन्क्रिप्शन खूप महत्वपूर्ण टेक्निक आहे.
Conclusion
तर मित्रांनो Encryption Meaning In Marathi या आजच्या आर्टिकल मध्ये आपण बघितले की एनक्रीप्शन म्हणजे काय आहे? आणि ते कसे काम करते व Encryption च्या मदतीने कसे आपण आपला डेटा किव्हा आपली माहिती हॅकर्स पासून गुप्त ठेऊ शकतो. जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर कमेंट बॉक्स मार्फत आम्हाला नक्की कळवा. जर तुम्हाला काही शंका असतील किव्हा अजून हि तुम्हाला Encryption बद्दल समजले नसेल तर खाली कंमेंट मध्ये नक्की नमूद करा.
धन्यवाद.
हे देखील वाचा
Very good information. Thank you.